सामाजिक कामातुन मानवता वाटणारा अवलिया ……!

आजचा युवक हा बहुतांश भांडखोर लंपक व्यसनी झाला आहे यामुळे आज कोणात राष्ट्रीय भावनाच उरली नाही राजकिय षढयंत्राला बळी पडुन अनेक युवक हे आपल आयुष्य बरबाद करता .पण असा हि परिस्थितीत सामाजिक भान जपत
“कोणी कसे वागोत ”
आम्ही सरळच वागतो
संपलेल दुख परत मागतो
म्हणुनच आम्हास जगुन मरायच नाही तर मरून जगायच आहे मानवतेच दान प्रत्येकाला वाटायच या भावनेने पछाडुन संघर्ष संकटाना तोंड देत जस संसार करून परमात्मा साधता येतो तसाच संसार करून सामाजिक काम अविरत करता येते या भावनेतुन कृतीशील आदर्श बाळगत सामाजिक काम अखंड करतो असा किशोर वसंतराव चोरगे हा चाळीशीकडे पदार्पन करणारा युवक म्हणतो जिवनाचा क्षणाचा भरोसा नाही म्हणुन तर आहे त्या वेळच सोन का करू नये म्हणत विचारांचे कृतीशील धाडस दाखवत एक आदर्श पण प्रसिध्दीची हाव नसणारा सामाजिक काम करणारा सामाजिक कामातुन मानवता वाटणारा हा अवलिया अनोखा आहे मातृभुमी,मातृभाषा,यांच्यावर प्रेमकरत परस्त्री मातेप्रमाणे आहे अगदी एच आय व्ही बाधित महिलाचा अंतविधीसाठी वर्गणी गोळा करून करतो अंतविधी केलेत तर अनाथ मुलिच्या विलाजा करता तहान भुक विसरून कार्यकरणारा किशोर हा मनाला भावुन जातो मंग दुकान कामगारांच्या व्यथेकरता आंदोलन करून न्यायाकरता लढणारा किशोरच वेगळच रूप मनात घर करून जात गावात पंचविस दिवसाड पाणी विरूध्द लढा देऊन गावातील घाणी मुळे दगाणा-या मुलांच्या न्यायाकरता आंदोलनाच शस्त्र उभारतांना प्रशासनाला धारेवर धरत प्रखर शब्दात जाब विचारणारा किशोर मंग जहाल मतवादी वाटतो चित परिचित लोकांना शासकिय योजना मिळाव्या वंचित उपेक्षित यांना न्याय मिळावा म्हणुन मदत करणारा हा अवलिया वेगळ्याच रूपाच दर्शन घडवुन जातो गणेशोत्सव नुसता धार्मिकतेच प्रतिक नाही तर देशाकरता लोकमान्य टिळकांनी उभारलेल आंदोलनाच हे मुक्त आपल व्यासपीठ असुन या व्यासपीठावरून राष्ट्रधर्माची ज्योत धगधगली पाहिजे आज देशावर इंग्राजाची सत्ता नाही त्याहि पेक्षा आपले सत्तर वर्षातील सत्ताधिश आप्त हे इंग्रजांचे वंशजच आहे ते देशाला लुटुन गेले आणि हे सत्तेकरता तोडो फोडो नितीने राज्य करून जातिय तेढ निर्माण करता म्हणुन जे कार्य गणेशोत्सवात टिळकांनी केल ते आज होण्याची गरज आहे हा विचार मनी बाळगुन जयहिंद विचार मंच ह्या विचार मंचच्या माध्यमातुन श्री गणेशाची स्थापना नकरता अनोखा गणपती उत्सव साजरा किशोर साजरा करतो या उत्सवाच स्वरूप रस्तावर फिरणा-या मनोरूग्ण महिला यांना जी संस्था संभाळते त्या संस्थेला या उत्सावात वर्गणी करून दिली जाते या माध्यमातुन एक बेवारस महिला हि सदर संस्थेत लोक वर्गणी करून स्वता किशोर व त्यांच्या मित्रांनी पोहच केली या व्यक्तीची विचाराची पध्दतच वेगळी आहे किशोर मध्ये राष्ट्र भावनेचा प्रभाव पाहता मन थक्क होत आज माझ्या देशाला बलिदानाची नाही श्रमदानाची गरज आहे म्हणत मी देशा करता मरणार नाही जिवंत राहून सेवा करेन अस्या विचाराने हा प्रखर युवक माझा धर्म एकच राष्ट्रधर्म माझी जात भारतीय माझा ध्वज तिरंगा असे त्याचे शब्द असता सकारत्मक विचाराचा सामाजिक कार्याला जोपासनारा हा यूवक खरच सामाजिक कामातुन मानवता वाटणारा आजच्या युवकांचा प्रेरणास्थान आदर्शवत आहे हे लिहणाच कारण म्हणजे आजच्या भ्रमित स्वार्थी आणि राजकारणीय अमिषाला बळी न पडणारा सामाजिक कार्यात अग्रेसर असणारा वर्षभर विविध उपक्रम राबवुन सामाजिक वसा जपणारा साधा सरळ आणि भारावुन काम करणारा राष्ट्रधर्माने वेडापिसा होऊन आपली संसाराची जवाबदारी संभाळुन काम करणारा माझा मित्र आहे दहा झाडे लावून ते जर उगवत नसेन तर दोनच झाडे लावून संगोपन करून वाढवुन बांधिलकी जपणारा आहे किशोरच्या जिवनाला या प्रकारे दिशा मिळण्याच कारण अस कि वयाच्या चाळीसाव्या दिवशी वडिल वारले आई ने अपार कष्ट केले मावशीच्या मदतीने संगोपन तर झाल पण पुरात घर पडल आणि आई च्या किडण्या निकामी झाल्या जिवनात वडिलांची नियतीने लाभलेली अपुरी साथ फार कष्ट दायक बालपण गेले यातून गरीबी जी जाणिव झाली आणि जे मदतीचे अल्पशा हात भेटले त्याची असा सामाजिक कार्याला स्वता वाहून घेऊन हे न फिटणारे ऋण हलके करण्याच आणि जर लोक आपल्यास मदत करता तर आपण का इतरांना करून नये अगदी अपघात ग्रस्ताला मित्राची विनवणी करून रूग्णवाहिनेकेची वाट न पाहता दुचाकीवर रूग्णालयात पोहच करून वाचवतो आणि या कार्याची वाच्यता नकरता कार्य करत राहणे हे आपल मानवतेच कार्य आहे या भावनेतुन कार्य अखंड करणारा किशोर विचाराच्या पलिकडे आहे अनेक वृत्तपत्रात सोशल मिडीयावर सामाजिक अध्यात्मिक वैचारिक लेखन करतो तेव्हा तर तो एक विचारवंत वाटतो याच सर्व श्रेय संस्काराचे मोती किशोरच्या मनात पेरण्याच काम त्याच्या आईच आहे आईने विचाराच शिवधनुष्य उचलेल किशोरच्या रूपाने मी पाहिल आहे संस्कार लावण्यासाठी मुलांच्या गालावर एक चामट न मारता मनावर शब्दाने केलेले संस्कार महत्वाचे किशोरची आई म्हणते संस्कार हे मारून नाही योग्य वेळी चांगल वाईटाची जान करून देत होतात फक्त योग्य वेळ साधता आली पाहिजे बस आणि योग्य वेळ साधत झालेल्या सूसंस्काराच टाईमीग किशोरच्या विचारातुन बोलण्यातुन प्रत्येक्ष वागण्यातुन कळत हे ह्या माऊलीने कृतीने दाखवुन दिल अगदी अगदी मी पाहिल आहे असा या निमित्ताने या माऊलीला माझे शतशः नमन हि व संवेदन शिल सामाजिक भान असणारा सक्षम मात्र निशब्द आणि पण भावनिक असणारा असा मित्र लाभणे भाग्य वाटते आणखी खुप आहे पण इमारत बांधकाम कामगारांच्या कल्याणासाठी आज हि त्याच कार्य जयहिंद विचार मंच या माध्यमातुन सुरू आहे शिक्षणात समानता येण्या करता नगर पालिका(शासकिय) शाळा आधुनिकीकरण करता आज त्याच आंदोलन भुक तहान विसरून सुरू आहे गावाच्या प्रश्नांसाठी सदैव लढत राहणाऱ्या किशोर बद्दल बोलायला शब्द शब्द पूरणार नाही पण सध्या जे सुचल ते आणि मी त्या संग राहुन जे शिकलो ते शब्दात अडकवण्याचा हा केविलवाणा प्रयत्न
दिलिप गणपतराव घुमरे
रा.गजानन नगर मु.पो.ता.कोपरगाव जि अ.नगर ४२३६०१


