राजकियसामाजिक

नवनिर्वाचित उपसरपंच वसीम सय्यदनूर शेख यांचा सत्कार सोहळा संपन्न

जाहिरात
जाहिरात
जाहिरात

नवनिर्वाचित उपसरपंच वसीम सय्यदनूर शेख यांचा सत्कार सोहळा संपन्न

कोपरगाव तालुक्यातील चांदेकसारे येथील उपसरपंच पदी वसीम सय्यदनूर शेख उर्फ बबलूभाई यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल सामाजिक कार्यकर्ते अरूण खरात यांचे हस्ते सत्कार करण्यात आला ग्रामपंचायत कार्यालयात पार पडलेल्या या कार्यक्रमास सरपंच किरण भाऊ होन, द्वारकानाथ आबा होन, तुळसिदास होन, अर्जुन होन, विलास चव्हाण, मल्लूभाऊ होन, धीरज बोरावके, पोपट आल्हाट, अर्जुन बोरवके, ओंकार आहेर तसेच इत्यादी ग्रामस्थ व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. यावेळी सत्काराला उत्तर देताना उपसरपंच वसीम शेख म्हणाले की तालुक्याचे लोकप्रिय आमदार आशुतोष दादा काळे यांनी माझ्यावरती विश्वास दाखवून माझ्या गळ्यात उपसरपंच पदाची माळा अर्पण केली या विश्वासाला मी कधीही तडा जाऊन देणार नाही. मी जनतेच्या सेवेसाठी सदैव उपलब्ध राहील तसेच गावामध्ये आमदार आशुतोष दादा काळे यांच्या मार्गदर्शनाखाली चांगल्यात चांगल्या सुख सुविधा कशा उपलब्ध करता येतील व योजना राबवता येतील यासाठी सदैव प्रयत्न करीन असा विश्वास व्यक्त केला. यावेळी सरपंच किरण होन म्हणाले की आम्ही दोघेही एकदिलाने काम करू व आमदार आशुतोष दादा काळे यांच्या मार्गदर्शनाखाली जनतेला चांगल्या प्रकारे सुविधा देऊ व चांदेकसारे गावच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव प्रयत्न करू. यावेळी उपस्थित सर्वांनीच वसीम शेख यांना शुभेच्छा दिल्या.



संपादक रवींद्र जगताप

सत्य एक्सप्रेस न्युजच्या व्हाँटसाँप ग्रुप वर सहभागी होण्यासाठी खालील लिंक दाबा

https://chat.whatsapp.com/CTDmmJtLO0G0xxPjGv1gcS

कोपरगाव शहरातील मुख्य रस्त्यानंतर उपनगरातील देखील अतिक्रमण काढणार :- मुख्याधिकारी सुहास जगताप सविस्तर बातमीसाठी खालील लिंक दाबा

https://youtu.be/FpimCnZBOxs?si=hD2M2-tsVUtqr-ir

 

 

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे