सुरेगावात तालुका कोपरगाव १ मे महाराष्ट्र दिना निमित्त एक-एक झाड लावण्याचा निर्धार
सुरेगावात तालुका कोपरगाव १ मे महाराष्ट्र दिना निमित्त एक-एक झाड लावण्याचा निर्धार
सुरेगाव तालुका कोपरगाव ग्रामपंचायत मध्ये १ मे महाराष्ट्र दिन मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला १ मे महाराष्ट्र दिना निमित्ताने झेंडावंदन करण्यात आले यावेळी तंटामुक्ती चे अध्यक्ष सदस्य ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते यावेळी कोपरगाव तालुक्याचे माजी उपसभापती वाल्मिक आप्पा कोळपे व मानवाधिकार शिल्पकार ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष मोतीराम दिनकरराव निकम सर ,’राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सामाजिक न्याय विभागाचे सेल्स तालुका अध्यक्ष यशवंतराव निकम’ ग्रामपंचायत सदस्य दादासाहेब जगताप’ राजेंद्र भंडारे ‘शरद मेहेरखाब ‘महेश निकम’ दीपक कदम अन्वर शेख निलेश निकम देवा निकम व कर्मचारी कोंडीराम निकम राहुल निकम बापूसाहेब कदम समाधान निकम अण्णासाहेब वाबळे शेरमाळे साळवे ग्रामपंचायत कर्मचारी व सुरेगाव ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्वांनी राष्ट्रगीत घेऊन राष्ट्रध्वजास मानवंदना दिली

तसेच १ मे चे महत्व डॉ.मोतीराम निकम सर यांनी झेंडावंदन करून सर्व ग्रामस्थांना समजावून सांगितले तसेच वाल्मीक आप्पा कोळपे यांनी १ मे दिवशी प्रत्येक सुरेगाव ग्रामस्थांनी उन्हाळ्याच्या उष्णतेचे परिणाम व पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी आपण सर्वांनी मिळून सार्वजनिक मालमत्तेचे रक्षण करणे हेभारतीय नागरिकाचे कर्तव्य समजून केले पाहिजे असे आव्हान केले गावातील गौण खनिज उत्खनन व वृक्षतोड थांबून प्रत्येक नागरिकांनी आज या दिवशी १ झाड लावून १ मे या दिवसाला खरी मानवंदना दिली पाहिजे म्हणून सर्व नागरिकांनी प्रत्येकाने एक एक झाड लावून निसर्गाचा समतोल राखण्यास मदत करावी असे सर्व ग्रामस्थांना आवाहन ग्रामस्थांना केले यावेळी सर्व ग्रामस्थांनी प्रत्येकाने एक एक झाड सुरेगावात लावण्याचे ग्रामपंचायतीचे आव्हान स्वीकारून नक्की सुरेगाव सुजलाम सुफलाम करण्यासाठी यासाठी प्रयत्न करू असे ग्रामपंचायत सदस्य दादासाहेब जगताप व महेश निकम ग्रामस्थांनी सांगितले व सर्वांचे आभार मानले व १ मे या महाराष्ट्र दिनानिमित्त सर्व नागरिकांना शुभेच्छा देण्यात आल्या





