राजकिय

आम्ही सदैव शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या सोबततच राहणार – गौतम बनसोडे

आम्ही सदैव शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या सोबततच राहणार – गौतम बनसोडे

संपादक :- रविंद्र जगताप

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार हे शिंदे फडणवीस यांच्या सोबत जाऊन उपमुख्यमंत्री पदाची शपथ नुकतीच घेतली त्या घटनेनंतर अनेक राजकीय घडामोडी सध्या महाराष्ट्रात घडत असताना अजित पवार यांनी केलेले बंड कोपरगाव शहरातील जयसिंगराव बनसोडे प्रतिष्ठान व तळागाळातील सर्वसामान्य कार्यकर्त्यांना आवडलेले नाही त्यामुळे त्यांचा जयसिंगराव बनसोडे प्रतिष्ठान व सर्वसामान्य गोरगरीब नागरिकांन मधून जाहीर निषेध केला जात आहे तसेच तालुक्यासह राज्यातील अनेक भागांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्वसामान्य कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्यात सध्या बैठका सुरू असून सध्या तरी अनेक मत मत्तांतरे होऊन यावर पर्याय असा काढला जात आहे की तळागाळातील सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्रजी पवार साहेब यांच्यासोबतच सर्वांनी खंबीरपणे उभे राहावे असे आवाहन जयसिंगराव बनसोडे प्रतिष्ठानच्या वतीने गौतम जयसिंगराव बनसोडे यांनी सर्वसामान्य गोरगरीब दिनदलित व शेतकरी बांधवांना आवाहन केले आहे तेव्हा पवार साहेबांनी खचून न जाता महाराष्ट्राच्या हितासाठी व महाराष्ट्रातील गोरगरीब सर्वसामान्य नागरिक व शेतकऱ्यांसाठी पुन्हा नव्या उमेदीने उभे राहून सर्वसामान्य कार्यकर्त्यांना साथ देऊन परत येणाऱ्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद सर्व कार्यकर्ते आम्ही तुम्हाला परत मिळून देऊ व जे सोडून गेले त्यांचा निषेध करून येणाऱ्या निवडणुकीत त्यांना त्यांची जागा दाखवल्या शिवाय जयसिंगराव बनसोडे फाउंडेशन व गोरगरीब सर्वसामान्य जनता स्वस्त बसणार नाही याची आम्ही पवार साहेबांना खात्री देतो व अजित पवार यांनी केलेले बंड याचा आम्ही सर्व सामान्य नागरिक व जयसिंगराव बनसोडे फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष गौतम जयसिंगराव बनसोडे तीव्र शब्दात जाहीर निषेध केला आहे.

जाहिरात
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे