धार्मिक

वारक-यांची सेवा हे ईश्वरीय कार्य- बिपिनदादा कोल्हे

वारक-यांची सेवा हे ईश्वरीय कार्य- बिपिनदादा कोल्हे

कैकाडी महाराज यांच्या दिंडीचे कोपरगांवात अग्रवाल परिवाराकडून स्वागत आणि सेवा उपक्रम…

पांडुरंगाच्या भेटीसाठी मोठ्या भक्तीभावाने पायी दिंडीने निघालेल्या जनसामान्य वारकरी यांना सेवा-सुविधा देण्याचे ईश्वरीय कार्य नारायण अग्रवाल परिवार करत असल्याचे मनोगत संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिनदादा कोल्हे यांनी केले.

जाहिरात

महान तपस्वी कैकाडी बाबा व ह. भ. प. कोंडीराम काका यांचा आनंदपुरी (मनमाड) ते पंढरपूर मार्गस्त असलेल्या दिंडीचा मुक्काम कोपरगांवात दिंडीचे स्वागताध्यक्ष नारायण अग्रवाल यांचे निवास आणि कृष्णाई बँक्वेट हाती येथे होता.दिंडीच्या स्वागतास प्रमुख अतिथी म्हणून संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिनदादा कोल्हे, ह. भ. प. भारत महाराज जाधव, तहसिलदार महेश सावंत, पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार, सहाय्यक पोलीस निरीक्षक रोठे, मुख्याधिकारी सुहास जगताप, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. विकास घोलप, डॉ. गायत्री कांडेकर, डॉ. प्रियंका मुळे, दिंडिचे स्वागताध्यक्ष नारायण अग्रवाल, सुषमा अग्रवाल, विरेश अग्रवाल, पुजा अग्रवाल, अमृतकेन संजीवनीचे चेअरमन पराग संधान, उद्योजक अरविंद भन्साळी, कैलासचंद ठोळे, माधवराव देशमुख, विशाल अग्रवाल (पाचोरा), मनोज अग्रवाल, दिलीप कोल्हे, धर्मयोध्दा भिमराव बडदे प्रतिष्ठानच्या मार्गदर्शिका भाग्यश्रीनानी बडदे, योग शिक्षिका विमल पुंडे, डॉ.संकेत मुळे, राजमाता जिजाऊ महिला मंडळ अध्यक्षा विजया देवकर, स्वच्छतादूत सुशांत घोडके, बबलू वाणी, वैभव आढाव, विजय बंब, सुधीर डागा, जितेंद्र गंगवाल, प्रसाद नाईक, प्रदिप साखरे, संतोष भट्टड,आदिनाथ ढाकणे, सनी वाघ, राकेश काले, दिपक अग्रवाल, जितेंद्र गंगवाल, यांचेसह वारकरी कोपरगांवातील नागरिक उपस्थित होते.

जाहिरात

दिंडीचे आगमन नारायण अग्रवाल यांचे निवासस्थानी झालेवर तेथे पुजा आरती करुन संतांचे अभंग टाळ मृदुंगाच्या गजरात गायन झाले. ईस्काॅनचे भक्त मंडळ मोठ्या भक्ती भावाने सहभागी झाले होते.प्रमुख अतिथी संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिनदादा कोल्हे यांना मानाची वारकरी पगडी, शेला, तुळशी हार देवून सन्मान करण्यात आला.

४७ वर्षांची परंपरा असलेल्या दिंडीचे ३२ वर्षापासून प्रसिद्ध व्यापारी नारायण अग्रवाल हे वारकरी यांची भोजन, निवास सुविधा उपलब्ध करुन देत विविध वस्तुंचे वाटप करतात. या वर्षीही वारक-यांना प्रवासी बॅगचे वितरण करण्यात आले. तसेच रोटरी क्लबच्या वतीने वारक-यांना रोटरीची शिदोरी म्हणून लोणचे, ठेचा पदार्थ देण्यात आले.संजीवनी युवा प्रतिष्ठान यांनी वारक-यांना वैद्यकीय तपासणी सुविधा उपलब्ध करुन दिली. तर महाराष्ट्र शासनाच्या वतीने प्राथमिक तपासणी आणि औषधे वितरण पथक तैनात होते.उपस्थितांचे स्वागत नारायण अग्रवाल यांनी तर सुत्रसंचालन स्वच्छतादूत सुशांत घोडके यांनी केले. शेवटी आभार योगेश जोबनपुत्रा व विरेश अग्रवाल यांनी मानले.

 

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे