ब्रेकिंग

१० मार्च हा काळा दिवस म्हणून अजून किती वर्ष पाळायचा?कोपरगाव तालुक्यातील सर्वपक्षीयांनी विस्थापितांना न्याय मिळवून द्यावा-कोपरगाव व्यापारी समिती निसार शेख

१० मार्च हा काळा दिवस म्हणून अजून किती वर्ष पाळायचा?कोपरगाव तालुक्यातील सर्वपक्षीयांनी विस्थापितांना न्याय मिळवून द्यावा-कोपरगाव व्यापारी समिती निसार शेख

कोपरगाव शहरातील अतिक्रमण काढून ११ वर्षे पूर्ण होत  असुन कोपरगाव शहरातील विस्थापितांना कधी न्याय मिळणार,गोरगरीब जनता आपली रोजी रोटी आनंदाने चालवित असतांना अतिक्रमण काढून अनेकांना धुळीस मिळविले.अनेकांचे घरे उदध्वस्त होवुन बेघर झाले.कोपरगावची बाजारपेठ नष्ट झाली अनेक व्यापारी कोपरगाव सोडून गेले.आज रोजी अनेक व्यापारी भाड्यापट्यावर गाळे घेवुन व्यवसाय करत आहे.कॊपरगावच्या या विस्थापिंताना कधी न्याय मिळणार? 

सहा नंबर शाळेच्या पाठीमागे जसे पत्र्याचे शेड मारून गाळे बांधून दिले तश्या प्रकारे त्या धर्तीवर ज्या ठिकाणी शक्य आहे त्या ठिकाणी पालिकेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी साहेबांनी व सर्वपक्षीयांच्या साथीने कामाला सुरुवात करून विस्थापितांना न्याय देण्याचे काम आता तरी करावे हेही जमत नसेल तर कमीत कमी पालिका प्रशासनाने त्यांना जागा निश्चित करून द्यावी स्वतः टपरी बांधून घेण्याची विस्थापितांची तयारी आहे ही नम्र विनंती,ना भूतो ना भविष्य असा ऐतिहासिक लढा विस्थापितांसाठी आमच्या व्यापारी समितीने उभारला होता ,जवळपास सर्वच राजकीय पक्षांचा, सामाजिक संघटनेचा पाठिंबा ही मिळाला होता, परंतु ,आमच्यावर  सर्व प्रकारचे दबावतंत्र वापरण्यात आले, परंतु आम्ही आज ही विस्थापितांना जो पर्यंत न्याय मिळत नाही तो पर्यंत त्यांच्या बरोबर ठामपणे उभे आहोत शासनाच्या आदेशाचे पालन  आम्ही त्या वेळेस केले व नेहमी करतोच , परंतु गेल्या ११ वर्षांपासून विस्थापितांना फक्त आणि फक्त खोट्या अश्वासना पलीकडे काही ही भेटलेल नाही,आम्हाला नगरपरिषद कडून सांगण्यात आले की लवकरच ८० गाळे बांधण्यास सुरवात होणार आहे ? आम्ही तहसील कार्यालय असेल,नगरपरिषद असेल, नगररचना विभाग, मा जिल्हाधिकारी साहेब,मा महसूल मंत्री ना थोरात साहेब,मा मुख्यमंत्री साहेब,अश्या विविध ठिकाणी लेखी व तोंडी असा पाठपुरावा सतत सुरू ठेवला होता ,मा जिल्हाधिकारी साहेबांनी देखील त्यांच्या बरोबर झालेल्या बैठकी दरम्यान मुख्यधिकारी सरोदे साहेबांना सांगितले होते की यांच्या काय मागण्या असेल त्या तातडी सोडवा, स्थानिक पातळीवर निर्णय घ्या असे नगररचना विभागाने देखील सांगितले होते,

परंतु पालिका प्रशासन जैसे थे च्या भूमिकेवर नेहमी ठाम आहे,उध्वस्त झालेल्या कुटुंबाला न्याय मिळवून देण्याच्या ११वर्ष केवळ बाता मारल्या गेल्या याच गोष्टींचे वाईट वाटते असो हा निती मत्तेचा खेळ असतोआम्ही नेहमी विस्थापितांच्या पाठीशी होतो व राहणार असे दिलेल्या प्रसिध्दी पत्रकात कोपरगाव व्यापारी समितीचे निसारभाई शेख म्हणाले आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे