सामाजिक

१० मार्च विस्थापितांसाठी काळा दिवस.याला जबाबदार कोण? – अजय विघे (श्रमिकराज)

१० मार्च विस्थापितांसाठी काळा दिवस.याला जबाबदार कोण? – अजय विघे (श्रमिकराज)

कोपरगाव – कोपरगाव शहरामध्ये १० मार्च २०११ रोजी कोपरगाव शहरातील अतिक्रमण काढण्यात आले तो दिवस विस्थापित धारकांसाठी काळा दिवस ठरला. याला जबाबदार कोण असा थेट सवाल प्रशासनाला व प्रस्थापित वर्गाला विस्थापित धारक व श्रमिकराज कामगार संघटनेचे तालुकाध्यक्ष अजय विघे यांनी उपस्थित केला आहे.

 श्रमिकराज कामगार संघटनेच्या वतीने व कोपरगाव व्यापारी समिती च्या वतीने वेळोवेळी आंदोलने करून निवेदन देऊन त्याचप्रमाणे ४-९-२० रोजी कोपरगाव नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील यांना सोबत घेऊन कोपरगाव नगरपालिकेचे मुख्याधिकारी  व कोपरगाव नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष यांना प्रत्यक्ष भेटून चर्चा करून व निवेदन देण्यात आली. परंतु कोणीही विस्थापितांसाठी पुढे येण्यास तयार नाही. तसेच कोपरगाव तालुक्यातील प्रस्थापित वर्ग यांना देखील गेल्या अकरा वर्षांमध्ये वेळोवेळी प्रत्यक्ष भेटून यांनादेखील जाग आली नाही. आणि विस्थापितांचा जिव्हाळ्याचा प्रश्न सोडवण्यास अपयशी ठरले.कोपरगाव विधानसभा  दोन पंचवार्षिक झाल्या प्रत्येक पंचवार्षिक मध्ये विस्थापितांचा प्रश्न प्रत्येक राजकीय पक्षांनी जाहीरनाम्यात घेतला परंतु विस्थापितांची दिशाभूल करून मतदान मिळवण्यात राजकीय मंडळी यशस्वी ठरली. आणि विस्थापितांचा प्रश्न आजही कोणी सोडण्यास तयार नाही. विस्थापितांना अक्षरशः कोपरगाव सोडून बाहेर गावी जावे लागले. तर काहींच्या मुलांचे शिक्षण अपूर्ण राहून गेले. काहींनी स्वतःच्या व्यवसाय साठी बँकेकडून कर्ज काढले होते. ते कर्ज वेळेवर भरता आले नाही. त्यामुळे स्वतःचे घर विकून बँकेचे हप्ते भरावे लागले. त्यामुळे काहींनी  आत्महत्या केल्या तर काही हृदय विकाराच्या झटक्याने मरण पावले.  अकरा वर्षांमध्ये  २७ विस्थापित टपरीधारक यांना  जीव गमवावा लागला. तरी  कोणालाही विस्थापितांन बद्दल कळवळा वाटला नाही. फक्त निवडणुकीमध्ये विस्थापितांना गाजर दाखवून मता पुरते विस्थापितांचा वापर करण्यात आला. व विस्थापितांना वार्यावर सोडून देण्यात आले. सर्व विस्थापितांना जाहीर आव्हान करण्यात येते की,      दिनांक १० मार्च २०२२ रोजी सकाळी १० वाजता  डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रवेश द्वार या ठिकाणी सर्वांनी उपस्थित राहावे.व कोपरगाव नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यासाठी सर्वांनी मोर्चामध्ये सहभागी व्हावे. असे आवाहन विस्थापित टपरीधारक व श्रमिकराज कामगार संघटनेचे तालुकाध्यक्ष अजय विघे यांनी केले आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे