महाराष्ट्र

कोपरगाव शहरातील मोकाट जनावरांची नसबंदी करण्याची मोहिम नगरपालिकेने राबवावी ..सामाजिक कार्यकर्ते किशोर चोरगे

कोपरगाव शहरातील मोकाट जनावरांची नसबंदी करण्याची मोहिम नगरपालिकेने राबवावी ..सामाजिक कार्यकर्ते किशोर चोरगे

 कोपरगाव शहरातील मोकाट जनावरांची नसबंदी करावी या  बाबत निवेदन दिले असुन  सामाजिक कार्यकर्ते किशोर चोरगे संस्थापक अध्यक्ष जयहिंद विचार मंच निवेदनात पुढे म्हंटले आहे कि कोपरगावात अनेक मोकाट जनावरांचा सुळसुळाट झाला आहे त्यामुळे अनेक ठिकाणी लोकवस्तीत हे जनावर राहतात लोक त्यांना भाकरी देतात त्यास त्यांचे खाद्य चारा मिळत नाही त्यांचा उदर निर्वाह हा मनुष्या सारखा लोकांच्या घरातील उरलेल्या भाकर भाजी वर होतो त्यामुळे त्यांची विष्ठा हि मनुष्या सारखी असते
आणि ते गल्ली काॅलनी मनुष्य वस्तीत कुठ हि ते मोकाट प्राणी जनावर विष्ठा विसर्जन करत मुक्त संचार करत असता आणि या मोकाट जनावरांची संख्या जास्त झाली असल्याने खुप प्रमात विष्ठा लघुशंका सर्वत्र उघड्यावर होते त्यामुळे घाण वास येतो व या विष्ठेमुळे अतिशय दुर्गंधी रोगराई पसरते डास होतात साथीचे आजार वाढतात त्यात नगरपालिका कधीच जंतु प्रतिबंधक फवारणी दर पाच दिवसांनी करत नाही म्हणून लोक लहान मुलं वृध्द मोठ्या प्रमाणात आजारी पडतात त्यात शासकिय दवाखाने हे देखावे म्हणुन आहे त्यामुळे जनतेला खाजगी रूग्णालयात जावं लागतं आणि आर्थिक लुटिला बळी‌ पडाव लागत असा वास्तववादी प्रश्न निवेदनातुन प्रशासना पुढं मांडत प्रशासनाला करत निवेदनात आणखी पुढे म्हंटले आहे कि पुर्वी मोकाट जनावर पकडुन कोंडवाड्यात टाकली जाऊन त्यांच्या मालकाकडुन दंड वसुल केला जायचा पण आता तसं होत नाही कारण कोपरगांव शहरातील सराफ बाजारातील हत्तीखान्यात जो कोंडवाडा होता तो भग्न होऊन मोडकळीस येऊन नगरपालिकाने बंद केला आहे याचा दुष्परिणाम हा समस्त कोपरगावातील सर्वच उपनगरातील जनतेला भोगावा लागत आहे
पण जनतेकडून कर वसुल करणाऱ्या नगरपालिकेला या जनतेच्या त्रासाच्या बाबीच काहीच गांभीर्या वाटत नाही म्हणुन अनेक दशकात हा प्रश्न मार्गी लागु शकला नाही कोपरगाव शहरातील अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी यावर आवाज उठवला आंदोलन केली पण उपयोग नाही आता जर मोकाट जनावरांचा प्रश्न नगरपालिकेला एकट्याने सोडवता येत नसेन तर नगरपालिकेने शासकिय पक्षु रूग्णालयाची मदत घेत त्या मोकाट जनावरांची नसबंदी करावी म्हणजे कालांतराने त्यांची संख्या कमी होईल आणि कोपरगावात शहरातील मोकाट जनावरांचा ऐरणीचा प्रश्न हि मार्गी लागेन तेव्हा कोपरगाव शहरातील मोकाट जनावरांची नसबंदी करावी आणि जनतेला या त्रासा पासुन मुक्त करावे अशी मागणी निवेदनात केली आहे

जाहिरात
जाहिरात

सत्य एक्सप्रेस न्युजच्या व्हाटसाँप ग्रुपवर सहभागी होण्यासाठी खालील लिंक दाबा.

https://chat.whatsapp.com/KgmXrffhj0F6D04zF6eSoo

छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास माहिती नाही,महाराष्ट्रात राहता का पाकिस्तानात, सविस्तर माहितीसाठी खालील लिंक दाबा

https://youtu.be/q1DvsD63HTY?si=IdUm4wcqflLWVXWO

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे