देश-विदेश

युवकांचे आयडॉल : विवेक कोल्हे 

युवकांचे आयडॉल : विवेक कोल्हे 
आज ज्ञान तंत्रज्ञानाने प्रगतीची मोठ मोठी शिखरे पादाक्रांत केली आहेत. समाजातील सगळचे हे ज्ञान आत्मसात करण्यासाठी झटत आहेत. त्यात सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे युवा अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य सहकारी साखर संघाचे संचालक विवेक कोल्हे यांचे नांव प्रकर्षाने घ्यावे लागेल. त्यांनी बी. ई. सिव्हील इंजिनियरींगचे शिक्षण पुर्ण करून समाजकार्याचा ध्यास हाती घेवुन युवकांचे आयडॉल म्हणून त्यांनी आपल्या कारकिर्दीची झेप घ्यायला नुकतीच सुरूवात केली आहे. सहकाररत्न माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे (आजोबा) यांच्या मार्गदर्शनातुन त्यांनी साखर कारखानदारी आणि त्याभोवती फिरणारे अर्थचक्र कसे काबीज करता येईल यासाठी कामाला सुरूवात केली आहे. वडील बिपीनदादा कोल्हे व मातोश्री सौ स्नेहलता बिपीनदादा कोल्हे यांचा समृध्द वारसा घेवुन ते समाजजीवनांत कार्यरत होतांना दिसत आहे. त्यांचा आज वाढदिवस त्यानिमीत्त शुभेच्छा द्यायच्या की त्यांच्याकडुन समाजविकासाचे काम करून घ्यायचे हा प्रश्न तुम्हा आम्हां सर्वांच्याच मनांत निर्माण होत आहे.
माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी सहजानंदनगर परिसरात समाजसेवी आणि जनकल्याणाचे व्रत परिपुर्णरित्या राबविले त्याची फळे तुम्ही आम्ही आज सर्वचजण चाखत आहोत. विवेक कोल्हे यांनी संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातुन सामाजिक कार्य व्रताचा आरंभ केला आहे. कोपरगांव ही भुमि ऐतिहासिक आणि संतांचा पौराणिक वारसा लाभलेली भुमि आहे. या भुमिचे ऐतिहासिक महत्व अधिकाधिक वाढविण्यांत विवेक कोल्हे सातत्यांने पुढाकार घेतात. तरुणाईला या कार्याची माहिती करून देतात. संत महंतांचा अलौकीक महिमा नेहमीच सत्कार्याला उभारी देत असतो त्याच आर्शिवादावर त्यांचे मार्गाक्रमण सुरू आहे. अहमदनगर जिल्हा हा सहकाराचा बालेकिल्ला म्हटलं तर वावगे ठरू नये. या जिल्हयात सर्वप्रथम वैकुंठभाई मेहता यांनी सहकारी साखर कारखानदारीच बीज रोवले आणि त्याचा आज विशाल वटवृक्ष झाला आहे. शेतकरी व त्यावर अवलंबून असणाऱ्या परिसराची आज समृद्धी झाली आहे.विना सहकार नही उध्दार या यशवंतराव चव्हाणांच्या ब्रिद वाक्यांने, स्व. वसंतदादा पाटील यांच्या पाणी अडवा पाणी जिरवा या संदेशाचे माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी तंतोतंत पालन करून शेतक-यांच्या शेतीला पाणी कसे मिळेल याची काळजी घेवुन त्याची बेधडक अंमलबजावणी करून गोदावरी नदीवर कोल्हापुर पध्दतीचे बंधारे बांधुन शेती सुजलाम सुफलाम करण्याचा प्रयत्न केला आहे.ग्रामिण अर्थकारणांला दिशा देवुन येथील शेतक-यांची क्रयशक्ती वाढविण्यासाठी संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांनी जाणिवपुर्वक प्रयत्न केले. सहकारी साखर कारखानदारीत जे जे नविन तंत्रज्ञान आले ते आत्मसात करून त्याची सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यात अंमलबजावणी केली. साखर कारखानदारी राज्याबरोबरच देशाला दिशादर्शक ठरतील अशा प्रकल्पांची यशस्वी उभारणी केली. साखर उद्योग आणि शेतकरी कसा वाचेल, त्यासाठी कोणते अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरले पाहिजे, मुक्त अर्थव्यवस्थेत आपल्याला टिकायचे असेल तर काय केले पाहिजे याचे बाळकडू वडील बिपीनदादा कोल्हे यांच्याकडुन आत्मसात करीत विवेक कोल्हे सध्या कार्य करीत आहेत.  मुक्त अर्थव्यवस्थेत निर्माण होणा-या स्पर्धेत टिकण्यांसाठी त्यांनी सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना व त्यावर अवलंबुन असलेल्या विविध रासायनिक उपपदार्थ प्रकल्पांचे आधुनिकीकरण करून पॅरासिटामॉल या औषधी प्रकल्पाची उभारणी हाती घेतली आहे. विवेक कोल्हे अभियांत्रीकी तज्ञ असल्यांने जगात सतत घडणा-या बदलावर त्यांचा नेहमीच कटाक्ष राहिलेला आहे. साखर उतारा चांगल्याप्रकारे मिळण्यांसाठी त्यांनी पाडेगांव उस संशोधन केंद्र, वसंतदादा शुगर इन्स्टीटयुट, कोईमतूर येथील सोसायटी फॉर शुगरकेन रिसर्च अँड डेव्हलपमेंट (एसएसआरडी) येथुन उस बेणे आणून शेतक-यांना थेट बांधावर त्याबाबतचे प्रगत मार्गदर्शन दिले. सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना उस बेणे मळयात सुमारे ६ हजाराच्या वर विकसीत उसाच्या जाती असुन त्याबाबतचे संशोधन व प्रयोग येथे नेहमीच घेतले जाते.  शेतक-यांच्या शेतीला जोडधंदा असावा यासाठी दुग्धोत्पादनाबरोबरच प्रेरक उद्योगधंदे, जोडधंदे, कुक्कुट पालन व्यवसाय, मत्स्य व्यवसाय, आदिंच्या माध्यमातुन त्यांचे सतत काम सुरूच आहे. सभासद शेतकरी आणि त्यावर अवलंबुन असणारे सारे घटक टिकले पाहिजे त्यांची आर्थीक उन्नती व्हावी यासाठीच्या प्रत्येक गोष्टी बरोबर जगात घडणाऱ्या नाविन्यपूर्ण बदलांचा ते अभ्यास करतात. अडचणीतील शेतक-यांना मदत करण्यांसाठी वडीलांच्या मार्गदर्शनाखाली विवेक कोल्हे हे सतत अग्रभागी असतात.  अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेचे संचालक होण्याची संधी त्यांना मिळाली त्यातुन त्यांनी जिल्हा बँकेच्या माध्यमातुन शेतक-यांना शाश्वत व कमी व्याजदरातुन कर्जपुरवठा उपलब्ध व्हावा यासाठी काय उपाययोजना केल्या पाहिजेत याबाबत तज्ञांचे मार्गदर्शन घेवुन त्याची अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा स्तरावर ते सतत कार्यरत असतात. कोपरगांव विधानसभा मतदार संघाचे आगामी विकासाचे व्हीजन काय असावे यासाठी त्यांनी आगामी दहा वर्षाचा प्रकल्प आराखडा तयार करून त्यावर काम करायला सुरूवात केली आहे.  सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे ते अत्यंत कमी वयात अध्यक्ष झाले. या पदाबरोबरच ते कोपरगांव औद्योगिक वसाहतीचे अध्यक्ष, साई संजीवनी को. ऑपरेटीव्ह बँकेचे अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य को जनरेशन असोसिएशन ऑफ इंडियाचे युवा संचालक, इफको नविदिल्लीचे आरजीबी मेंबर, सहकाररत्न शंकरराव कोल्हे शेतकरी सहकारी संघाचे संचालक म्हणुनही ते काम पहात आहेत.   संजीवनी प्रतिष्ठानच्या माध्यमातुन त्यांनी सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळयाचे आयोजनातुन ८७ वधु वर जोडपी विवाहबध्द करून त्यांना मणिमंगळसुत्रासह संसारपयोगी साहित्याचे मोफत वाटप करून त्यांच्या जीवनात आनंद निर्माण केला आहे. अलिकडेच जगावर कोरोनाचे महासंकट ओढवले त्यात संजीवनी डेडीकेटेड केविड सेंटर उघडुन त्यामार्फत हजारो रुग्णांवर औषधोपचारासह मोफत उपचार करून अनेकांचे प्राण वाचविले आहे., चोवीसतास अहोरात्र विनामुल्य रुग्णवाहिकेची सेवा उपलब्ध करून दिली. आजही कोपरगांव तालुक्यावर कुठलेही नैसर्गीक, मानवनिर्मीत संकट ओढवले तरी संजीवनी उद्योग समुह मदतीच्या भावनेने सर्वात पुढे असतो, अशा समाजकार्यरूपी नेतृत्वाला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा.
रमेश घोडेराव,
उपाध्यक्ष, सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना, कोपरगाव.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे