धार्मिक

श्रीक्षेत्र धामोरी या ठिकाणी एक दिवसीय नवनाथ ग्रंथ पारायण सोहळ्यास भव्य असे महिला व पुरुष सेवेकरांची मांदियाळी

श्रीक्षेत्र धामोरी या ठिकाणी एक दिवसीय नवनाथ ग्रंथ पारायण सोहळ्यास भव्य असे महिला व पुरुष सेवेकरांची मांदियाळी

धामोरी प्रतिनिधी दत्तात्रय घुले दिनांक 17 ऑगष्ट
कोपरगाव तालुक्यातील धामोरी येथील ओम श्री गोरक्ष अडबंगी नाथांची तपोभूमी असलेले श्रीक्षेत्र धामोरी या ठिकाणी एक दिवसीय नवनाथ ग्रंथ पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या ठिकाणी ओम श्री शिव गोरक्ष अडबंगी नाथाय नमः जगात एकमेव नऊ फांद्यांचा विस्तार असलेला महाकाय कल्पवृक्ष चैतन्य जती अरबंगीनाथांची तपोभूमी,जन्मभूमी, व दीक्षाभूमी श्रीक्षेत्र धामोरी तालुका कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर येथील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र धामोरी अंतर्गत आज रविवार दिनांक 17 ऑगस्ट 2025 रोजी पहाटे 6.30 पासून ते पारायण संपेपर्यंत भव्य दिव्य असे श्री नवनाथ ग्रंथ पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले कार्यक्रमाच्या शेवटी प्रसाद खिचडी व आमटी.वाटप करण्यात आली होते. यामध्ये धामोरी व परिसरातील महिला व पुरुष सेवेकरी भाविकांनी हजारोच्या संख्येने उपस्थित राहून पारायण सोहळ्यास आपला सहभाग नोंदविला होता.

जाहि

जाहिरात
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे