नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत करा. माजी उपसरपंच .युवानेते बलराज धनवटे.
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत करा. माजी उपसरपंच .युवानेते बलराज धनवटे.
पुणतांबा:- नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे शिर्डी विधानसभा व कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील बहुतांशी शेतकरी बांधवांचे मोठ्या प्रमाणात उभ्या पिकांचे नुकसान झाले आहे.मोठ्या कष्टाने उभारलेले पिक हातातोंडासी आलेला घास निसर्गाचे लहरीमुळे हिरवला गेला.ऊस.सोयाबीन.मका. व इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात भुईसपाट होऊन नुकसान झाले आहे.शेतकरी बांधव मोठ्या अडचणीत सापडला असुन त्यांना तातडीने शासनाकडून मदत मिळावी.तसेच काहींचे घरामध्ये पाणी घुसुन मोठ्या प्रमाणात संसार उपयोगी वस्तूचें नुकसान झाले.काहींचे या पावसामुळे घरे पडली.पुणतांबा ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील अनेक कुटुंबांना याचा फटका बसला . संबंधित विभागाने त्यांचे पंचनामे करून त्यांना तातडीने शासनाकडून मोठी मदत मिळावी व घरकुले मंजूर करावी .ज्यांची घरकुले मंजूर आहे त्यांना घरकुल बांधकामासाठी शासनाच्या धोरणानुसार नियमाने मिळणारी वाळु पाणी ओसरल्यावर लवकरात लवकर उपलब्ध व्हावी . अन्यथा नुकसानग्रस्त बांधवासह लवकरच आंदोलन उभारण्यात येईल तसेच माजी आमदार सौ स्नेहलताताई कोल्हे.युवानेते विवेकभैय्या कोल्हे साहेब यांची भेट घेऊ .असे पुणतांबा ग्रुप ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच.युवानेते बलराज धनवटे यांनी पत्रकाद्वारे सांगितले असुन पत्रकावर अमोल देहाडराय.गजेंद्र जाधव.अविनाश धनवटे.बाळासाहेब जाधव.संभाजी गमे.पुणतांबा शिवसेना शहरप्रमुख महेश कुलकर्णी यांच्या सह्या आहेत.


