महाराष्ट्र

महायुतीचा आंनदाचा शिधा व्हॅटिलेटरवर पुणतांबा :-शिवसेना शहरप्रमुख महेश कुलकर्णी

 

महायुतीचा आंनदाचा शिधा व्हॅटिलेटरवर पुणतांबा :-शिवसेना शहरप्रमुख महेश कुलकर्णी

महाराष्ट्र राज्यातील गोरगरीब जनतेला आकर्षित करण्यासाठी महायुती सरकारने सामान्य जनते साठी सणासुदीला सुरु केलेली योजना म्हणजे आंनंदाचा शिधा आज व्हॅटिलेटरवर असल्याच्या शंका उपस्थित होत आहे.त्याच बरोबर दहा रुपयाची शिव भोजन थाळी हि योजना गुंडाळली गेली आहे. तसेच जिल्ह्या वाईज गावा गावात ग्रामीण भागात कामगार भोजन योजना याआधीच बंद पडली असुन.त्यात हा आनंदाचा शिधा व्हॅटिलेटरवर असल्याने सामान्य जनतेपुढे ऐन सणासुदीच्या काळात मोठा प्रश्न उभा करणारा ठरणार आहे. याबाबत अनेक राजकीय पक्ष.सामाजिक संघटना.यांचे वतीने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. महायुती सरकार फक्त घोषणांचा पाऊस पाडत आहे आज शेतकरी बांधव . शेतमजूर अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानी मुळे भरडला गेला आहे.पिक विमा कंपनीचे दुर्लक्ष व महायुती सरकार यांची तुटपुंज्या मदतीवर बोळवण केली जात आहे.एकीकडे उद्योगपतींना अब्जावधी रुपये कर्ज माफी केली जाते हा दुजा भाव आहे.बळीराजा देशाचा पोशिंदा अन्नदाता आहे.आज अन्नदात्यावर बेतलेली परीस्थिती बघता भविष्यात आपली स्थिती नेपाळ सारखी होऊ शकते असं पुणतांबा शिवसेना शहरप्रमुख महेश कुलकर्णी यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात आपले मत मांडले आहे

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे