धार्मिक
धामोरी येथील वारकरी सांप्रदायातील भजनी मंडळाच्या संकल्पनेतून भुपाळी काकडा भजन आरतीचे आयोजन
धामोरी येथील वारकरी सांप्रदायातील भजनी मंडळाच्या संकल्पनेतून भुपाळी काकडा भजन आरतीचे आयोजन
प्रतिनिधी दत्तात्रय घुले/ कोपरगाव तालुक्यातील धामोरी येथील वारकरी सांप्रदायातील भजनी मंडळाच्या पारंपारिक संकल्पनेतुत सालाबादप्रमाणे पांरपारिक श्रध्देने कोजागिरी पोर्णिमेपासून तर कार्तिक स्थानाच्या त्रिपुरा पोर्णिमे पर्यंत या कालावधीत दररोज पहाटे ५ ते ७ या वेळेत भुपाळी काकडा भजन सेवा उत्साह सोहळ्याचे आयोजन करण्यात येते. यावेळी धामोरी येथील वारकरी सांप्रदायातीत भजनी मंडळाचे सेवेकरी श्री हनुमान मारुती मंदिरातील नवनाथ भजनी मंडळ ग्रुप, श्री संत सावता महाराज भजनी मंडळ ग्रुप, अडबंगीनाथाय भजनी मंडळ ग्रुप तसेय विठ्ठल रुख्मीनी मंदिरातील भजनी मंडळ ग्रुप सातत्याने भुपाळी काकडा भजन सोहळा सेवा करीत असते.




