धार्मिक

दीपावली पाडवा भजनसंध्या आंतरिक ऊर्जेचे केंद्र – पराग संधान

दीपावली पाडव्यानिमित्त श्री वरदविनायक दत्त मंदिरात सांज पाडवा भजनसंध्या संपन्न

दीपावली पाडवा भजनसंध्या आंतरिक ऊर्जेचे केंद्र – पराग संधान

कोपरगाव –विजेता तरूण मंडळ संचलित इंदिरा पथ, कोपरगाव येथील श्री वरदविनायक दत्त मंदिर येथे दीपावली पाडव्यानिमित्त सायंकाळी भजनसंध्येचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात कराओके सिंगर प्रा. धनंजय हंडे सर, प्रा. उल्हारे सर आणि रविंद्र उत्तमराव सुपेकर यांनी विविध भक्तिगीते, अभंग व भजन सादर करून श्री वरदविनायक आणि श्री दत्त महाराजांच्या चरणी आपली संगीत सेवा अर्पण केली. त्यांच्या सुरेल आणि दमदार सादरीकरणाने श्रोते मंत्रमुग्ध झाले.

या प्रसंगी अमृत संजीवनी केन ट्रान्सपोर्टचे चेअरमन पराग संधान यांनी उपस्थित कलाकारांचे विशेष कौतुक करत त्यांना प्रोत्साहन दिले. पुढील काळात नवोदित कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी असेच उपक्रम राबवले जातील, असे त्यांनी आश्वासन दिले.आपल्या धार्मिक आणि सांस्कृतिक मूल्यांची जपवणूक करण्यासाठी सण उत्सव हे सामाजिक ऐक्याचे प्रतिंबीब असतात या भावनेने असे उपक्रम राबविण्यात येतात असेही पराग संधान यावेळी म्हणाले.

जाहिरात

कार्यक्रमाला कोपरगाव पंचायत समितीचे माजी सभापती सुनील देवकर उपस्थित होते. भजनसंध्या समाप्तीनंतर सर्व कलाकारांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.या प्रसंगी मंडळाचे अध्यक्ष गणेश आढाव यांच्यासह बाळासाहेब गवारे, अमित वडांगळे, वैभव सोनवणे, शंकरराव देवकर, राजेंद्र सुपेकर, स्वप्नील ठोंबरे, ऋषिकेश देवकर, प्रकाश चव्हाण, कैलास गवारे, नईमभाई शेख, बाबासाहेब आढाव, गुरुनाथ सुपेकर, रोहित जाधव, उमेश देसाई आदी मान्यवर उपस्थित होते.

संपादक रवींद्र जगताप,कोपरगाव

सत्य एक्सप्रेस न्युजच्या व्हाँटसाँप ग्रुपवर सहभागी होण्यासाठी खालील लिंक दाबा

https://chat.whatsapp.com/IWdNrQEPOAw6LDkI6AkHAk

दिपावलीचे नवे स्वरूप राजकीय ओली दुष्काळाची दिवाळी २०२५ कशी जाणुण घ्या खालिल लिंक दाबून

https://youtu.be/oLgXcz2aurI?si=qTBddf2E2_ymu5vX

सत्य एक्सप्रेस youtbe chhanal पहाण्यासाठी खालील लिंक दाबा व चँनल सबस्क्राईब करा

https://www.youtube.com/@satyaexpressnews

धार्मिक ब्लाँग पहाण्यासाठी खालील लिंक दाबा

https://youtube.com/playlist?list=PL3j0O8rqVMWP4evas-rsmf1AV4ZkbIr8j&si=ZWWHIRV6FcdqDo2I

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे