महाराष्ट्रराजकिय

भाजपा,आर. पी.आय लोकसेवा आघाडीचे उमेदवार आज उमेदवारी अर्ज करणार दाखल

भाजपा,आर. पी.आय लोकसेवा आघाडीचे उमेदवार आज उमेदवारी अर्ज करणार दाखल

” चला उमेदवारी अर्ज भरायला विकासाचं कमळ फुलवायला “

भारतीय जनता पार्टी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आणि लोकसेवा आघाडी कोपरगाव यांच्या सर्व उमेदवारांचा उमेदवारी अर्ज 17 नोव्हेंबर रोजी भरला जाणार आहे. संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे, माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली व युवानेते विवेकभैय्या कोल्हे यांच्या नेतृत्वात नगराध्यक्ष पदाचे उमेदवार संधान पराग शिवाजी व नगरसेवक पदाचे सर्व उमेदवार यांचे अर्ज मोठ्या जल्लोषात दाखल केले जाणार आहे.

जाहिरात

कोपरगाव शहराला सातत्याने भेडसावत असणाऱ्या समस्या या सुटण्यासाठी सक्षम आणि प्रत्यक्ष मैदानात उतरून काम करणारे नेतृत्व गरजेचे आहे. रस्ते पाणी आरोग्य स्वच्छता या समस्या मोठ्या प्रमाणावर भेडसावत आहे. नागरिकांना मूलभूत सुविधा देण्यामध्ये पालिका प्रशासन आणि आमदार हे कमकुवत ठरले आहे. चार वर्षापासून प्रशासक असताना सर्वाधिकार आमदारांकडे होते मात्र शहरात समस्यांचा महापूर दिवसेंदिवस वाढत राहिला. यावर ठोस काम करणारे नेतृत्व म्हणून नगराध्यक्ष पदासाठी पराग संधान आणि त्यांच्या समवेत नगरसेवक पदाचे सर्व उमेदवारांचे अर्ज दाखल करून प्रचाराची रंगत येणार आहे.

यावेळी सकाळी 10 वाजता पदयात्रा निघणार असून साहित्यरत्न लोकशाहीर डॉ.आण्णाभाऊ साठे स्मारक, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक, विघ्नेश्वर मंदिर, दत्त मंदिर, छत्रपती शिवाजी महाराज स्मारक व त्यानंतर तहसील मैदान कोपरगाव या ठिकाणी सर्व एकत्रितरित्या जाणार आहेत.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे