महाराष्ट्रराजकिय

जनतेच्या हक्कासाठी, व जनतेच्या सेवेसाठी प्रभाग क्रमांक १ मध्ये सामाजिक कार्यकर्ते निसार शेख यांचा उमेदवारी अर्ज दाखल

जनतेच्या हक्कासाठी, व जनतेच्या सेवेसाठी प्रभाग क्रमांक १ मध्ये सामाजिक कार्यकर्ते निसार शेख यांचा उमेदवारी अर्ज दाखल

कोपरगाव प्रतिनिधी:- कोपरगाव शहरामध्ये नगरपालिका निवडणुकीचे पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी आपले उमेदवार रिंगणात उतरवले आहे यंदा अनेक पक्षांना उमेदवारी देताना अडचणी आल्या . कोपरगावात राजकीय गणिते मोठ्या प्रमाणात बिघडलेली आहेत. कोपरगाव शहरातील प्रभाग क्रमांक १ मध्ये सामाजिक कार्यकर्ते निसार शेख हे देखील निवडणुकीच्या रिंगणात उतरले. निसार शेख यांनी अनेक सामाजिक कामात सहभाग नोंदवून नागरिकांच्या मोठ्या प्रमाणात सेवा केली आहे. त्यांच्या या कार्याची दखल नागरिकांनीच घेतली असून नागरिकांनीच त्यांची उमेदवारीसाठी मागणी केली आहे. त्यांनी प्रभागाच्या विकासासाठी निवडणुकीत उतरावे अशी मागणी जनतेने केली निसार शेख यांनी यापूर्वी हद्द वाढ गटारी रस्ते पाणीपुरवठा असे अनेक प्रश्नावर आंदोलने केली आहेत. पावसाळ्यात या प्रभागामध्ये मोठ्या प्रमाणात नागरिकांची गैरसोय होत असते यावेळी निसार शेख यांनी नगरपालिकेला निवेदन देऊन अनेक प्रश्न त्यांनी मार्गी लावले आहे वेळप्रसंगी त्यांनी आंदोलने देखील केली आहेत त्यामुळे सामाजिक कार्यकर्ते निसार शेख यांचा उमेदवारी अर्ज दाखल झाल्यामुळे या प्रभागात रंगत वाढली आहे निसार शेख यांच्या उमेदवारीमुळे प्रभागातील अनेक प्रश्न मार्गी लागतील असे नागरिकांनी भावना व्यक्त केल्या आहेत.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे