चित्रपट अभिनेते , टीव्ही स्टार ,विघ्नेश जोशी यांची कोपरगावला भेट.
चित्रपट अभिनेते , टीव्ही स्टार ,विघ्नेश जोशी यांची कोपरगावला भेट.
संपादक- रविंद्र जगताप

कोपरगाव प्रतिनिधी – कोरोनाच्या या वाईट काळातून बाहेर पडून ,लवकरच लोकांना करमणुक व मनोरंजनासाठी , याच बरोबर कोपरगावातील लहान मुलांना स्टेज डेरिंग व लहानापासून ते तरुणानं परीयन्त ते जेष्ठां परियन्त अभिनयाला वाव मिळण्यासाठी व आपली नाट्य संस्कृती टिकवण्यासाठी लवकरच स्नेहाकित सांस्कृतिक मंडळ कोपरगाव यांचे वतीने व नागरिकांच्या सहकार्याने लवकरच वर्ष भर नाट्यमालिका सुरू करण्याचा मानस आहे. या साठी मार्गदर्शन करण्यासाठी अभिनेते विघ्नेश जोशी यांनी खास निमंत्रणा वरून कोपरगाव ला धावती भेट दिली.यावेळी श्रीकांत जी बागुल , महानंदा दूध संघाचे राजेंद्र बापू जाधव , माजी.नगराध्यक्ष मंगेश पाटील , प्रसिद्ध कॉन्टॅक्टर अनिलभाऊ सोनवणे , प्रा.गणेश देशमुख , व्यापारी विजय जी नानकर , दीपक घोडले , चेतन गवळी, कैलास सूर्यवंशी यांनी साई तपोभूमी येथे अभिनेते विघ्नेश जोशी यांच्या सत्कार केला. त्यांनी साई तपोभूमी येथील साई मंदिरात साई बाबांचे दर्शन घेतले. या वर्ष भर घेण्यात येणाऱ्या , व्याख्यानमाला नाट्यमालिका , मनोरंजनाचे , गायनाचे कार्यक्रम सातत्याने वर्ष भर नियोजन पूर्वक राबवण्यासाठी अभिनेते विघ्नेश जोशी आले होते. तरी लवकरच व्यापक बैठक घेऊन, सर्व नागरिकांनी यात भाग घेऊन , शक्य तेव्हडे योगदान कालाप्रेमींनी ही द्यावे असे निवेदन करण्यात आले


