ब्रेकिंगमहाराष्ट्र

भारतीय शुगरचा बेस्ट इनोव्हेटीक शुगर प्लॅन्ट पुरस्कार स्व. शंकरराव कोल्हे व सभासदांना समर्पित – विवेकभैय्या कोल्हे.

राष्ट्रीय पातळीवरील भारतीय शुगर संस्थेने सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यास बेस्ट इनोव्हेटीक शुगर प्लॅन्ट पुरस्कार देऊन पुणे येथे गौरव केला, सदरचा पुरस्कार स्वीकारताना कारखान्याचे अध्यक्ष, युवा नेते विवेकभैय्या कोल्हे व सर्व संचालक मंडळ, कार्यकारी संचालक बाजीराव सुतार आदी उपस्थित होते

भारतीय शुगरचा बेस्ट इनोव्हेटीक शुगर प्लॅन्ट पुरस्कार स्व. शंकरराव कोल्हे व सभासदांना समर्पित – विवेकभैय्या कोल्हे.

संपादक:- रविंद्र जगताप
कोपरगांव :-माजीमंत्री स्वं शंकरराव कोल्हे यांनी संघर्षातून संजीवनी उद्योग समुह उभा करत त्यातून परिसराचा कायापालट केला, सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे सुत्रधार संचालक बिपीनदादा कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली देशात सर्वप्रथम ज्युस टु इथेनॉल उत्पादन घेत अनेक रासायनीक उपपदार्थ प्रकल्प साकारले आहे, भारतीय शुगर या राष्ट्रीय पातळीवरील संख्येने कारखान्याची बेस्ट इनोव्हेटीक शुगर प्लॅन्ट पुरस्कार देऊन गौरव केला, हा पुरस्कार स्व. शंकरराव कोल्हे व सभासद, उस उत्पादक शेतकऱ्याच्या चरणी समर्पित करत असल्याचे प्रतिपादन अध्यक्ष व युवानेते विवेकभैय्या कोल्हे यांनी केले.
बुधवार ७ सप्टेंबर २०२२ रोजी विमाननगर पुणे येथे झालेल्या कार्यक्रमात भारतीय शुगर संस्थेचे अध्यक्ष विक्रमसिंह शिंदे, एनएसआय कानपुर संस्थेचे डायरेक्टर नरेंद्र मोहन, चीफ एडिटर संग्रामसिंह शिंदे यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यांत आला त्याप्रसंगी ते बोलत होते.श्री. विवेकभैय्या कोल्हे पुढे म्हणाले की, कारखान्याचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे, भाजपाच्या प्रदेश सचिव सौ स्नेहलताताई कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली सहकार महर्षी शंकरराव कोल्हे साखर कारखान्याची घोडदौड अशीच कायम ठेवण्याचा प्रामाणिक प्रयत्न यापुढेही सुरू ठेवला आहे, ग्रामीण अर्थकारणाला बळकटी देऊन शेतकरी समृद्ध व्हावा हे माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांचे स्वप्न होते त्यासाठी त्यांनी सात दशके संघर्ष करत देश विदेशात सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचा नावलौकीक वाढवला. केंद्र व राज्य शासन तसेच नॅशनल फेडरेशन नवि दिल्ली, महाराष्ट्र राज्य सहकारी साखर संघ, वसंत दादा शुगर इन्स्टिट्यूट पुणे, शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशन, डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशन, नेशनल हेवी, इफको, कृभको नवीदिल्ली आदि संस्थांनी संजीवनीस देश व राज्य पातळीवर विविध २५ पारितोषके देऊन गौरवलेले आहे.
याप्रसंगी कारखान्याचे उपाध्यक्ष रमेश घोडराव, संचालक सर्वश्री. ज्ञानेश्वर परजणे, विश्वासराव महाले, बापुसाहेब बारहाते, निलेश देवकर, बाळासाहेब वक्ते, रमेश आभाळे, ज्ञानदेव औताडे, आप्पासाहेब दवंगे, राजेंद्र कोळपे, ज्ञानेश्वर होन, मनेष गाडे,. विलास वाबळे, विलास माळी, त्र्यंबकराव सरोदे, सतीष आव्हाड, सौ. उषा संजय औताडे, सौ. सोनिया बाळासाहेब पानगव्हाणे, कार्यकारी संचालक बाजीराव जी. सुतार, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह मॅनेजर प्रकाश डुंबरे, रासायनिक विभागाचे प्रोडक्शन मॅनेजर टी. व्ही. देवकर, एच आर मॅनेजर प्रदीप गुरव, बायोगॅस विभागाचे पी. एस. अरगडे, शुगर गोडाऊन इन्चार्ज भास्करराव बेलोटे आदी प्रमुख उपस्थित होते.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे