महाराष्ट्र

सौ. सुशीलामाई काळे महाविद्यालयाच्या ज्योती रजपूतची ‘आव्हान–२०२६’ शिबिरासाठी निवड

सौ. सुशीलामाई काळे महाविद्यालयाच्या ज्योती रजपूतची ‘आव्हान–२०२६’ शिबिरासाठी निवड

कोपरगाव-कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीच्या सौ. सुशीलामाई काळे कलावाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाची विद्यार्थिनी ज्योती रजपूत हिची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत ‘आव्हान–२०२६’ राज्यस्तरीय आपत्कालीन व्यवस्थापन प्रशिक्षण शिबिरासाठी निवड करण्यात आली असल्याची माहिती महाविद्यालयाच्या प्र.प्राचार्या डॉ.सौ.विजया गुरसळ यांनी दिली आहे.

जाहिरात
जाहिरात

डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठअकोला येथे हे शिबीर पार पडत आहे. शिबिराच्या माध्यमातून पूरभूकंपआगचक्रीवादळतसेच मानवनिर्मित आपत्तींच्या वेळी मदतकार्य कसे करावेयाचे सैद्धांतिक आणि प्रात्यक्षिक प्रशिक्षण विद्यार्थ्यांना दिले जाते. आपत्तीच्या वेळी प्राथमिक उपचार,जखमींचे सुरक्षित स्थलांतर,आपत्कालीन परिस्थितीत संपर्क व्यवस्था याबाबत उच्च अधिकाऱ्यांचे मार्गदर्शक व्याख्याने आयोजित करण्यात आली आहेत.

जाहिरात

आव्हान शिबिरासाठी निवड होणे ही विद्यार्थ्यांसाठी आणि महाविद्यालयासाठी सन्मानाची बाब असून शिस्तप्रियसामाजिक कार्यात सक्रियनेतृत्वगुण असलेले आणि राष्ट्रीय सेवा योजनेत सातत्याने कार्य करणारे विद्यार्थी यांचीच या शिबिरासाठी निवड करण्यात येते. तसेच राज्य व राष्ट्रीय पातळीवर स्वयंसेवकांची ओळख निर्माण होऊन आत्मविश्वास वाढणेसंकटसमयी धैर्याने निर्णय घेण्याची क्षमता विकसित होणेसमाजसेवेसाठी सज्ज होणे यासोबतच करिअरसाठी उपयुक्त असा अनुभव आणि प्रमाणपत्रही या शिबिरात सहभागी विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे.  ज्योती रजपूत या विद्यार्थिनीची आव्हान शिबिरासाठी निवड झाल्याबद्दल कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटी चेअरमन मा.आ.अशोकराव काळे, विश्वस्त .आशुतोष काळे, व्हा.चेअरमन छबुराव आव्हाड, सचिव सौ. चैतालीताई काळे तसेच सर्व गव्हर्निंग कौन्सिल सदस्य, संस्था इन्स्पेक्टर प्रा. नारायण बारे,महाविद्यालयाच्या प्र.प्राचार्या डॉ.सौ.विजया गुरसळ,राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्रा.भीमराव रोकडे व प्रा.विशाल पोटे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे.

संपादक रवींद्र जगताप,कोपरगाव

सत्य एक्सप्रेस न्युजच्या व्हाँटसाँप ग्रुपवर सहभागी होण्यासाठी खालील लिंक दाबा

https://chat.whatsapp.com/IWdNrQEPOAw6LDkI6AkHAk

दिपावलीचे नवे स्वरूप राजकीय ओली दुष्काळाची दिवाळी २०२५ कशी जाणुण घ्या खालिल लिंक दाबून

https://youtu.be/oLgXcz2aurI?si=qTBddf2E2_ymu5vX

सत्य एक्सप्रेस youtbe chhanal पहाण्यासाठी खालील लिंक दाबा व चँनल सबस्क्राईब करा

https://www.youtube.com/@satyaexpressnews

धार्मिक ब्लाँग पहाण्यासाठी खालील लिंक दाबा

https://youtube.com/playlist?list=PL3j0O8rqVMWP4evas-rsmf1AV4ZkbIr8j&si=ZWWHIRV6FcdqDo2I

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे