महाराष्ट्र

सौ. सुशीलामाई काळे महाविद्यालयाच्या कार्तिक पठारेची आंतरविभागीय हॉकी स्पर्धेसाठी निवड

सौ. सुशीलामाई काळे महाविद्यालयाच्या कार्तिक पठारेची आंतरविभागीय हॉकी स्पर्धेसाठी निवड

कोपरगाव- कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीच्या सौ.सुशीलामाई काळे कलावाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचा विद्यार्थी कार्तिक पठारे याने हॉकी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करून महाविद्यालयाच्या नावलौकिकात भर घातली आहे. ओंकारनाथ मालपाणी विधी महाविद्यालयसंगमनेर येथे नुकत्याच पार पडलेल्या आंतर महाविद्यालयीन हॉकी स्पर्धेत कार्तिकने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत संघाच्या यशात मोलाचा वाटा उचलला. त्याच्या दमदार कामगिरीची दखल घेत त्याची निवड टि.जे. महाविद्यालयखडकी (पुणे) येथे आयोजित आंतरविभागीय हॉकी स्पर्धेसाठी करण्यात आली असल्याची माहिती प्र.प्राचार्या डॉ. सौ. विजया गुरसळ यांनी दिली आहे.

जाहिरात
जाहिरात

पुणे येथे झालेल्या स्पर्धेतह कार्तिकने आपल्या खेळातील सातत्यवेगवान चाली आणि संघभावनेच्या जोरावर उत्कृष्ट खेळी साकारली. परिणामी त्याने पुन्हा एकदा महाविद्यालयाचे नाव उंचावले. या उल्लेखनीय कामगिरीच्या बळावर त्याची निवड एल.एन.सी.टी. विद्यापीठभोपाळ येथे होणाऱ्या पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ हॉकी स्पर्धेसाठी करण्यात आली.भोपाळ येथे झालेल्या पश्चिम विभागीय स्पर्धेतही कार्तिकने आपली छाप पाडली. त्याच्या उत्कृष्ट खेळाचे आणि तांत्रिक कौशल्याचे मूल्यमापन करत निवड समितीने त्याची थेट अखिल भारतीय आंतरविद्यापीठ हॉकी स्पर्धेसाठी निवड केली आहे. ही देशव्यापी स्पर्धा संबलपूर विद्यापीठओडिसा येथे होणार असून ही कार्तिकसह संपूर्ण महाविद्यालयासाठी अभिमानास्पद बाब आहे.

जाहिरात

कार्तिक पठारेच्या मिळविलेल्या यशाबद्दल कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटी चेअरमन मा.आ.अशोकराव काळे, विश्वस्त .आशुतोष काळे, व्हा.चेअरमन छबुराव आव्हाड, सचिव सौ. चैतालीताई काळे तसेच सर्व गव्हर्निंग कौन्सिल सदस्य, संस्था इन्स्पेक्टर प्रा. नारायण बारे,महाविद्यालयाच्या प्र.प्राचार्या डॉ.सौ.विजया गुरसळ, क्रीडा संचालक डॉ. राजेंद्र चव्हाण यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

संपादक रवींद्र जगताप,कोपरगाव

सत्य एक्सप्रेस न्युजच्या व्हाँटसाँप ग्रुपवर सहभागी होण्यासाठी खालील लिंक दाबा

https://chat.whatsapp.com/IWdNrQEPOAw6LDkI6AkHAk

दिपावलीचे नवे स्वरूप राजकीय ओली दुष्काळाची दिवाळी २०२५ कशी जाणुण घ्या खालिल लिंक दाबून

https://youtu.be/oLgXcz2aurI?si=qTBddf2E2_ymu5vX

सत्य एक्सप्रेस youtbe chhanal पहाण्यासाठी खालील लिंक दाबा व चँनल सबस्क्राईब करा

https://www.youtube.com/@satyaexpressnews

धार्मिक ब्लाँग पहाण्यासाठी खालील लिंक दाबा

https://youtube.com/playlist?list=PL3j0O8rqVMWP4evas-rsmf1AV4ZkbIr8j&si=ZWWHIRV6FcdqDo2I

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे