कोपरगाव शहरात गोवंश हत्या सुरूच ,कठोर कारवाई करावी:- वहाडणे

कोपरगाव शहरात गोवंश हत्या सुरूच ,कठोर कारवाई करावी:- वहाडणे
कोपरगाव शहरामध्ये गोवंश हत्या सुरूच आहे अनेक वेळा शहरातील संजय नगर परिसरामध्ये आयेषा कॉलनी या ठिकाणी अनेकदा गोवंश विक्री करणाऱ्यावर कारवाई करण्यात आली आहे राज्यात गोवंश जातीच्या जनावरांचे कत्तल करण्यास मनाई असताना देखील अनेक वेळा गोवंश हत्या केली जात आहे यावर कठोर कारवाई करण्यात यावी यासाठी युवा कार्यकर्ते शिवराज विजय वहाडणे यांनी नुकतेच नगरपालिका चे नूतन नगराध्यक्ष पराग संधान यांना लवकरात लवकर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी त्यांनी दिलेल्या प्रसिध्दीपत्रकातुन केली आहे. पुढे त्यांनी म्हटले आहे की शहरातील जातीय सलोखा टिकून ठेवायचा असेल तर गोवंश हत्या संदर्भात विशेष पथक तयार करून सदरील ठिकाणे उध्दवस्त करावी अशी मागणी त्यांनी केली आहे. असंख्य गोरक्षक यांची भावना समजून कठोर कारवाई करण्यात यावी अशी अपेक्षा शिवराज वहाडणे यांनी व्यक्त केली




