शिर्डी जवळील निमगाव निघोज येथील साई पदयात्रींना विविध सेवा सुविधा देणारे साई पालखी निवारा राज्यातच नव्हे तर देशात झाले प्रसिद्ध!
शिर्डी ( प्रतिनिधी)
शिर्डी जवळील निमगाव निघोज येथे नगर-मनमाड महामार्गाच्या रस्त्यालगतच साई पालखी निवारा असून या साई पालखी निवारा मध्ये येणार्या साईभक्तांच्या पालख्यांना व साई पदयात्रींना राहण्याची,निवासाची मोफत व्यवस्था करण्यात येत असून या साईधाम ट्रस्ट विरारतर्फे येथे भक्तांसाठी विविध उपक्रम व सेवा सुविधाही उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.त्यामुळे साई पालखी निवारा संपूर्ण देशात आता प्रसिद्ध झाले आहे.शिर्डी जवळील निमगाव निघोज येथील साई धाम ट्रस्ट विरारचे साई पालखी निवारा हे मोठे प्रसिद्ध व साईभक्तांची सेवा सुविधा देणारे एक मोठे केंद्र बनले आहे.साईधाम ट्रस्टच्या सर्व विश्वस्त यांच्या मार्गदर्शनाखाली साई पालखी निवारा मध्ये विविध उपक्रम राबविले जात असून येथे येणाऱ्या साईभक्तांच्या पालख्या,पदयात्री यांना मोफत नाश्ता,जेवण,चहा पाण्याची व्यवस्था करण्यात येते.साईधाम ट्रस्टच्या माध्यमातून साई पालखी निवारा मध्ये गोरगरिबांच्या मुर्लींचे लग्न विनामूल्य व अन्नदानासह मोठ्या थाटामाटात लावले जाते,तसेच एमपीएससी,यूपीएससी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व्हावे म्हणून त्यासाठी साईधाम ट्रस्टच्या माध्यमातून इमारत बांधली असून ती साई संस्थांनला देणगी म्हणुन भेट देण्यात आली आहे,तसेच एका जिव्हाळा बालसंगोपन केंद्र व वृद्धआश्रम या साठी ही साई पालखी निवारात मोफत रूम देण्यात आली आहे.या बालसंगोपन व वृध्दाश्रमाचे उध्दघाटन निमगावचे माजी सरपंच भाऊसाहेब कातोरे,सरपंच कैलास कातोरे,साईपालखी निवाराचे व्यावस्थापक स्वप्निल शिन्दे,सौ वंदना विजय गुंजाळ,सुनिता जगन्नाथ जपे,भाउसाहेब रंगनाथ मते,त्रबंक धर्माजी आहीरे,जगन्नाथ राजाराम जपे रावसाहेब तुळशीराम एखंडे सुलक्षना प्रकाश पाटील
क्रुष्णा मरीन्ना वालेकर समाजिक कार्यकर्त सिमोन जगताप,तसेच येथे श्री महादेवाची भव्य अशी मूर्ती असून ती येथे मोठे आकर्षण ठरत आहे.तसेच विविध आकृत्या,पुतळे,आकर्षक उद्यान,वृक्ष येथील वातावरण प्रसन्न ठेवतात.येथे त्यामुळेच पायी चालत आलेल्या साई पदयात्रेना साई पालखी निवारात आल्यानंतर मोठा आनंद समाधान मिळते,असे हे साई पालखी निवारा साई धाम ट्रस्ट विरार व सर्व विश्वस्तांच्या मार्गदर्शनाखाली व येथील कर्मचारी वृंद यांच्या परिश्रमातून मोठ्या भक्तिभावाने सुरू आहे.


