महाराष्ट्र

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या शेतकरी भवन भुमीपुजन कार्यक्रमावर उपसभापती, संचालकांचा बहिष्कार

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या शेतकरी भवन भुमीपुजन कार्यक्रमावर उपसभापती, संचालकांचा बहिष्कार

कोपरगाव वार्ताहर :- कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने रविवार (दि.२९) रोजी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवनाचा भुमीपुजन समारंभ तसेच विविध विकास कामांचा लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे. मात्र या कार्यक्रमावर आम्ही बहिष्कार टाकला असल्याची माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती व संचालकांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात दिली आहे.

दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात उपसभापती व संचालकांनी असे म्हटले आहे की, कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने रविवार (दि.२९) रोजी दुपारी १.३० वाजता राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवनाचा भुमीपुजन समारंभ तसेच विविध विकास कामांचा लोकार्पण सोहळा राज्याचे पणनराजशिष्टाचार मंत्री ना. जयकुमार रावल यांच्या हस्ते आयोजित करण्यात आलेला आहे. मात्र या कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेमध्ये जिल्ह्याचे पालकमंत्री तथा जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांचे राजशिष्टाचार (प्रोटोकॉल) नुसार नामोल्लेख न करणे तसेच माजी आमदार अशोकरावजी काळे यांचा निमंत्रण पत्रिकेत ज्येष्ठतेनुसार नामोल्लेख न करता फक्त औपाचिरकता म्हणुन नको त्याठिकाणी नामोल्लेख करण्यात आला आहे.

याबाबत कृषी उत्पन्न बाजार समितीने उपसभापती, संचालक यांच्याबरोबरच ज्यांच्या हस्ते भूमिपूजनाचा कार्यक्रम होणार आहे ते कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी पणन व राजशिष्टाचार मंत्री ना.जयकुमार रावल यांना देखील अनभिज्ञ ठेवले आहे. तसेच सदर कार्यक्रमाच्या नियोजनामध्ये आम्ही उपसभापती,विद्यमान सदस्य यांना विश्वासात न घेता राजकीय हव्यासापोटी सत्तेचा गैरवापर करुन कृषी उत्पन्न बाजार समीतीचे सर्व सभासदशेतकरीव्यापारीहमालमापाडी यांची दिशाभूल केली आहे. हि बाब निषेधार्थ असून त्यामुळे सदर कार्यक्रमाचा आम्ही निषेध करत असुन या कार्यक्रमावर जाहीर बहिष्कार टाकत असल्याचे दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात उपसभापती व संचालकांनी म्हटले आहे.या कार्यक्रमाचा जाहीर निषेध करीत असल्याबाबतचे लेखी पत्र जिल्ह्याचे पालकमंत्री तथा जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील, पणनराजशिष्टाचार मंत्री ना.जयकुमार रावल,आमदार आशुतोष काळे, मा.जिल्हा उपनिबंधक,जिल्हा निबंधक कार्यालय अहिल्यानगर, मा. सहायक निबंधक,सहायक निबंधक कार्यालय कोपरगाव, सचिव, कृषी उत्पन बाजार समिती कोपरगाव, मा.जिल्हा परिषद सदस्य राजेश परजणे, शिवसेना नेते नितीन औताडे आदींना पाठविण्यात आले असल्याचे सांगितले आहे. त्या पत्रावर उपसभापती गोवर्धन परजणे, संचालक संजय माधवराव शिंदे, राजेंद्र शंकरराव निकोले, रामदास भिमाजी केकाण, शिवाजीराव बापूराव देवकर, ऋषिकेश मोहनराव सांगळे, खंडू पुंजाबा फेपाळे, लक्ष्मणराव विश्वनाथ शिंदे यांच्या सह्या आहेत

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे