राष्ट्रवादीच्या धरणे आंदोलनाला यश,घरपट्टी वाढीला तूर्तास स्थगिती

राष्ट्रवादीच्या धरणे आंदोलनाला यश,घरपट्टी वाढीला तूर्तास स्थगिती
कोपरगाव वार्ताहर-कोपरगाव नगरपरिषदेने केलेल्या अवाजवी वाढीव घरपट्टी व नगरपरिषदेच्या इतर चुकीच्या निर्णयांविरोधात कोपरगाव राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने आमदार आशुतोष काळे यांच्या मागर्दर्शनाखाली सोमवार (दि.२२) पासून कोपरगाव शहरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज स्मारक याठिकाणी सुरु करण्यात आलेल्या धरणे आंदोलनाला यश आले आहे. सर्वसाधारण सभेत घरपट्टी वाढीच्या प्रस्तावावर निर्णय होत नाही तोपर्यंत कोपरगाव नगरपरिषद प्रशासनाकडून घरपट्टी वाढीला तूर्तास स्थगिती देण्यात आली असल्याचे कोपरगाव नगरपरिषदेचे उपमुख्याधिकारी मनोजकुमार पापडीवाल यांनी लेखी आश्वासन दिले आहे. त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून धरणे आंदोलन स्थगित करण्यात आले असल्याचे कोपरगाव शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

कोपरगाव नगरपरिषद प्रशासनाकडून नगरपरिषद हद्दीतील नागरिकांना कोणतीही पूर्वसूचना न देता त्यांच्यावर वाढीव दराने घरपट्टी (मालमत्ता कर) आकारण्यात येवून मालमत्ताधारकांना अधिकृत पावत्या देखील वाटप करण्यात आल्या होत्या. केलेली वाढ मोठ्या प्रमाणात असल्यामुळे हि अवाजवी केलेली वाढ कोपरगावकरांच्या खिशाला अजिबात परवडणारी नव्हती त्यामुळे नागरीकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले होते. परंतु या चुकीच्या घरपट्टी (मालमत्ता कर) वाढी संदर्भात राष्ट्रवादी कॉंग्रेसने आवाज उठवून हि करवाढ मागे घ्यावी अशी लेखी मागणी केली होती. मालमत्तांचे वर्गीकरण, निर्धारीकरण कसे केले याची कोणतीही अधिकृत माहिती नागरिकांना देण्यात आली नसल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण तयार होवून या करवाढीबाबत आमदार आशुतोष काळे यांच्या जनसंपर्क कार्यालयात हजारो हरकती नोदाविल्या होत्या.

त्यामुळे कोपरगावकरांना न्याय मिळवून देण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने धरणे आंदोलनाचे हत्यार उपसले होते. सुरु करण्यात आलेल्या या धरणे आंदोलनाच्या पहिल्याच दिवशी हजारो कोपरगावकरांसह विविध संघटनांचा या आंदोलनाला पाठिंबा मिळाला होता. सलग दुसऱ्या दिवशीही अशीच परिस्थिती राहिल्याने आंदोलनाची व्याप्ती वाढण्यास सुरुवात झाली असतांना कोपरगाव नगरपरिषदेचे उपमुख्याधिकारी मनोजकुमार पापडीवाल, कर विभागाचे अधिकारी धुमाळ यांनी आंदोलनस्थळी आंदोलनकर्त्यांची भेट घेवून त्यांच्या भावना जाणून घेत आंदोलनकर्त्यांच्या मागण्या नगरपरिषदेकडून मान्य केल्या. सर्वसाधारण सभेत घरपट्टी वाढीच्या प्रस्तावावर निर्णय होत नाही तोपर्यंत घरपट्टी वाढीला तूर्तास स्थगिती देण्यात आली असल्याचे लेखी आश्वासन दिले. त्यामुळे कोपरगाव शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून धरणे आंदोलन स्थगित करण्याचे जाहीर करण्यात आले. सर्वसाधारण सभेत घरपट्टी वाढीच्या प्रस्तावावर निर्णय घेण्यात येणार असून तोपर्यंत नागरिकांना वाढीव घरपट्टीच्या पावत्या वितरित केल्या जाणार नाहीत असे असले तरी नागरिकांच्या हितासाठी ही आवाजवी घरपट्टी वाढ रद्द किंवा स्थगित करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक सभागृहात ठामपणे पाठपुरावा करणार असल्याचे कोपरगाव शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून सांगण्यात आले आहे.

संपादक रवींद्र जगताप,कोपरगाव
सत्य एक्सप्रेस न्युजच्या व्हाँटसाँप ग्रुपवर सहभागी होण्यासाठी खालील लिंक दाबा
https://chat.whatsapp.com/LKQzgSRnpEmErDjaBKTgct
कोपरगावात वास्तव राहिलेल्या शुरविरांची एतिहासिक माहिती सांगणारे सुमित डेंगळे यांचे व्याख्यान
https://youtu.be/Df5URqrYhUg?si=Ekk0eEF7k6jq00Hr
सत्य एक्सप्रेस youtbe chhanal पहाण्यासाठी खालील लिंक दाबा व चँनल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/@satyaexpressnews
धार्मिक ब्लाँग पहाण्यासाठी खालील लिंक दाबा
https://youtube.com/playlist?list=PL3j0O8rqVMWP4evas-rsmf1AV4ZkbIr8j&si=ZWWHIRV6FcdqDo2I
संपादक रविंद्र जगताप सत्य एक्सप्रेस
संपादकीय लेख क्र १२ :-कोपरगावचे पत्रकार शंकर दुपारगुडे यांच्या रुपाने जिल्ह्याचे नाव जगभर झळकले,सविस्तर लेख वाचण्यासाठी खालील लिंक दाबा
https://satyaexpress24x7.blogspot.com/2026/02/blog-post_28.html
संपादकीय लेख क्र ११ भारतातील वाढते औद्योगीकरण आणि वाढती लोकसंख्या नागरिकांच्या आरोग्यासमोरील गंभीर आव्हान सविस्तर लेख वाचण्यासाठी खालील लिंक दाबा
https://satyaexpress24x7.blogspot.com/2026/02/blog-post.html
संपादकीय लेख क्र. १० कोपरगावात थंडीचा वाढता जोर, तर निवडणुकीत उमेदवारांची धावपळ आणि कसरत ! सविस्तर लेख वाचण्यासाठी खालील लिंक दाबा
संपादकीय लेख क्र ९ स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जाहीर परंतु इच्छुक उमेदवारामध्ये कभी खुशी कभी गम सविस्तर लेख वाचण्यासाठी खालील लिंक दाबा
संपादकीय लेख क्र ८ मान्सून पूर्व पावसाने गृह उद्योगाचे मोठे आर्थिक नुकसान सविस्तर लेख वाचण्यासाठी खालील लिंक दाबा
https://satyaexpress24x7.blogspot.com/2025/05/blog-post_28.html
संपादकीय लेख क्र ७ कोपरगावचा बिहार बिड होवु नये यासाठी सर्वांनी एकत्र येणे गरजेचे सविस्तर लेख वाचण्यासाठी खालील लिंक दाबा
https://satyaexpress24x7.blogspot.com/2025/04/blog-post_88.html
संपादकीय लेख क्र. ६ चैत्र व वैशाख महिण्याचे कोपरगावचे अध्यात्मिक महत्व संपुष्टात? सविस्तर लेख वाचण्यासाठी खालील लिंक दाबा
https://satyaexpress24x7.blogspot.com/2025/04/blog-post_28.html
संपादकीय लेख क्र. ५ अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवटची आणि महत्वाची कोपरगाव शहरा नजीक असलेल्या या चौफुलीची दुर्दशा कधी मिटणार सविस्तर लेख वाचण्यासाठी खालील लिंक दाबा
https://satyaexpress24x7.blogspot.com/2025/01/blog-post_8.html
संपादकीय लेख क्र. ४ सावळीविहिर ते कोपरगाव रोड जलद गतीने होणे गरजेचे सविस्तर लेख वाचण्यासाठी खालील लिंक दाबा
https://satyaexpress24x7.blogspot.com/2024/06/blog-post.html
संपादकीय लेख क्र.३ श्रीमंतांच्या बेवड्या मुलांवर आवर घालणे गरजेचे सविस्तर लेख वाचण्यासाठी खालील लिंक दाबा
संपादकीय लेख क्र.2. जागतिक ग्राहक दिन, जागरूक ग्राहक होणे काळाची गरज, सविस्तर लेख वाचण्यासाठी खालील लिंक दाबा
https://satyaexpress24x7.blogspot.com/2024/03/blog-post_15.html
संपादकीय लेख क्र.१ कोपरगाव ची महाशिवरात्र आनंदाची एक पर्वणी आणि कोपरगावच्या महाशिवरात्रीचे बदलते स्वरुप सविस्तर लेख वाचण्यासाठी खालील लिंक दाबा
https://satyaexpress24x7.blogspot.com/2024/03/blog-post_9.html


