सत्ताधाऱ्यांच्या उदासीनतेमुळे समतानगर परिसरातील नागरिकांना चिखल तुडवावा लागला-शैलेश साबळे

सत्ताधाऱ्यांच्या उदासीनतेमुळे समतानगर परिसरातील नागरिकांना चिखल तुडवावा लागला-शैलेश साबळे
कोपरगाव वार्ताहर-पहिल्याच पावसाने कोपरगाव शहरातील समतानगर परिसरातील नगरपरिषद सत्ताधाऱ्यांचा ढिसाळ आणि भ्रष्ट कारभार पूर्णपणे उघड झाला आहे. पहिल्याच अल्प पावसात परिसरातील संपूर्ण कच्चे रस्ते चिखलमय झाले असून रस्त्यांवर चालणे देखील कठीण झाले आहे.आम्ही सातत्याने मुरूम टाकण्याच्या केलेल्या मागणीकडे सत्ताधाऱ्यांनी उदासीनता दाखवल्यामुळे समतानगर परिसरातील नागरिकांना आणि विद्यार्थ्यांना चिखल तुडवत ये जा करावी लागत असल्याची टीका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्यकर्ते शैलेश साबळे यांनी केली आहे.

पावसाळा सुरू होण्यापूर्वी समतानगर परिसरातील भूमिगत गटारींचे काम प्राधान्याने पूर्ण करून घेऊन कच्च्या रस्त्यांवर मुरूम टाकण्याची कोपरगाव शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने नगरपरिषदेकडे मागील चार महिन्यांपासून वारंवार मागणी केली जात आहे. मात्र सत्ताधाऱ्यांच्या या वेळकाढू आणि बेजबाबदार धोरणामुळे पहिल्याच किरकोळ पावसात परिसरात अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचून मोठ्या प्रमाणावर चिखल तयार झाला आहे. यामुळे स्थानिक नागरिकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. सध्या शाळा सुरू झाल्या असल्याने विद्यार्थ्यांना याच चिखलातून आणि घाणीतून जीव मुठीत धरून शाळेत जावे लागत आहे. या चिखलातून दुचाकी घसरून अपघात होण्याचा धोका वाढला आहे. चार महिने वारंवार मागणी करूनही पालिकेने कोणतीही ठोस पावले उचलली नसल्याने सत्ताधाऱ्यांच्या या अत्यंत उदासीन भूमिकेबद्दल समता नगरमधील नागरिकांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

समतानगर परिसरात ज्या ठिकाणी चिखल झाला आहे त्या ठिकाणी आणि जिथे मुरूम टाकण्याची अत्यंत गरज आहे तिथे नगरपरिषदेने कोणतीही दिरंगाई न करता तातडीने मुरूम टाकून रस्ते पूर्ववत करावेत. पावसाळा संपेपर्यंत कुठलाही रस्ता खोदू नये पावसाळा संपल्यानंतर मग काम चालू करावी चांगले रस्ते फोडू नयेत.सुविधांच्या नावाखाली नगरपरिषद नागरिकांवर मोठ्या प्रमाणावर कर आकारणी करीत आहे. तर मग नागरिकांना देखील त्या स्वरुपात सुविधा का मिळत नाही असा सवाल राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्यकर्ते शैलेश साबळे यांनी नगरपरिषद सत्ताधाऱ्यांना विचारला आहे.

संपादक रवींद्र जगताप,कोपरगाव
सत्य एक्सप्रेस न्युजच्या व्हाँटसाँप ग्रुपवर सहभागी होण्यासाठी खालील लिंक दाबा
https://chat.whatsapp.com/LKQzgSRnpEmErDjaBKTgct
कोपरगावात वास्तव राहिलेल्या शुरविरांची एतिहासिक माहिती सांगणारे सुमित डेंगळे यांचे व्याख्यान
https://youtu.be/Df5URqrYhUg?si=Ekk0eEF7k6jq00Hr
सत्य एक्सप्रेस youtbe chhanal पहाण्यासाठी खालील लिंक दाबा व चँनल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/@satyaexpressnews
धार्मिक ब्लाँग पहाण्यासाठी खालील लिंक दाबा
https://youtube.com/playlist?list=PL3j0O8rqVMWP4evas-rsmf1AV4ZkbIr8j&si=ZWWHIRV6FcdqDo2I
संपादक रविंद्र जगताप सत्य एक्सप्रेस
संपादकीय लेख क्र १२ :-कोपरगावचे पत्रकार शंकर दुपारगुडे यांच्या रुपाने जिल्ह्याचे नाव जगभर झळकले,सविस्तर लेख वाचण्यासाठी खालील लिंक दाबा
https://satyaexpress24x7.blogspot.com/2026/02/blog-post_28.html
संपादकीय लेख क्र ११ भारतातील वाढते औद्योगीकरण आणि वाढती लोकसंख्या नागरिकांच्या आरोग्यासमोरील गंभीर आव्हान सविस्तर लेख वाचण्यासाठी खालील लिंक दाबा
https://satyaexpress24x7.blogspot.com/2026/02/blog-post.html
संपादकीय लेख क्र. १० कोपरगावात थंडीचा वाढता जोर, तर निवडणुकीत उमेदवारांची धावपळ आणि कसरत ! सविस्तर लेख वाचण्यासाठी खालील लिंक दाबा
संपादकीय लेख क्र ९ स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जाहीर परंतु इच्छुक उमेदवारामध्ये कभी खुशी कभी गम सविस्तर लेख वाचण्यासाठी खालील लिंक दाबा
संपादकीय लेख क्र ८ मान्सून पूर्व पावसाने गृह उद्योगाचे मोठे आर्थिक नुकसान सविस्तर लेख वाचण्यासाठी खालील लिंक दाबा
https://satyaexpress24x7.blogspot.com/2025/05/blog-post_28.html
संपादकीय लेख क्र ७ कोपरगावचा बिहार बिड होवु नये यासाठी सर्वांनी एकत्र येणे गरजेचे सविस्तर लेख वाचण्यासाठी खालील लिंक दाबा
https://satyaexpress24x7.blogspot.com/2025/04/blog-post_88.html
संपादकीय लेख क्र. ६ चैत्र व वैशाख महिण्याचे कोपरगावचे अध्यात्मिक महत्व संपुष्टात? सविस्तर लेख वाचण्यासाठी खालील लिंक दाबा
https://satyaexpress24x7.blogspot.com/2025/04/blog-post_28.html
संपादकीय लेख क्र. ५ अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवटची आणि महत्वाची कोपरगाव शहरा नजीक असलेल्या या चौफुलीची दुर्दशा कधी मिटणार सविस्तर लेख वाचण्यासाठी खालील लिंक दाबा
https://satyaexpress24x7.blogspot.com/2025/01/blog-post_8.html
संपादकीय लेख क्र. ४ सावळीविहिर ते कोपरगाव रोड जलद गतीने होणे गरजेचे सविस्तर लेख वाचण्यासाठी खालील लिंक दाबा
https://satyaexpress24x7.blogspot.com/2024/06/blog-post.html
संपादकीय लेख क्र.३ श्रीमंतांच्या बेवड्या मुलांवर आवर घालणे गरजेचे सविस्तर लेख वाचण्यासाठी खालील लिंक दाबा
संपादकीय लेख क्र.2. जागतिक ग्राहक दिन, जागरूक ग्राहक होणे काळाची गरज, सविस्तर लेख वाचण्यासाठी खालील लिंक दाबा
https://satyaexpress24x7.blogspot.com/2024/03/blog-post_15.html
संपादकीय लेख क्र.१ कोपरगाव ची महाशिवरात्र आनंदाची एक पर्वणी आणि कोपरगावच्या महाशिवरात्रीचे बदलते स्वरुप सविस्तर लेख वाचण्यासाठी खालील लिंक दाबा
https://satyaexpress24x7.blogspot.com/2024/03/blog-post_9.html


