ब्रेकिंग

शिर्डी लोकसभा मतदारसंघातील ६६ रुग्णांना पंतप्रधान साहाय्यता निधीतून १ कोटी ७४ लाख रुपयांचे अर्थसाहाय्य

शिर्डी लोकसभा मतदारसंघातील ६६ रुग्णांना पंतप्रधान साहाय्यता निधीतून १ कोटी ७४ लाख रुपयांचे अर्थसाहाय्य

शिर्डी, दि. २४ जून :- शिर्डी लोकसभा मतदारसंघातील गंभीर आजारांनी ग्रस्त ६६ रुग्णांना पंतप्रधान साहाय्यता निधीतून आतापर्यंत १ कोटी ७४ लाख ७ हजार ५०० रुपयांचे आर्थिक साहाय्य उपलब्ध करून देण्यात आले आहे. या अर्थसाहाय्याचा लाभ मिळण्यासाठी संबंधित रुग्ण उपचार घेत असलेले रुग्णालय पंतप्रधान साहाय्यता निधीच्या मान्यताप्राप्त पॅनेलमध्ये समाविष्ट असणे आवश्यक असल्याची माहिती खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी दिली.

या अर्थसाहाय्यांतर्गत कोपरगाव तालुक्यातील नऊ रुग्णांना २४ लाख ४७ हजार ५०० रुपये, नेवासा तालुक्यातील १४ रुग्णांना ३८ लाख ५० हजार रुपये, राहता तालुक्यातील आठ रुग्णांना २२ लाख २५ हजार रुपये, संगमनेर तालुक्यातील १५ रुग्णांना ४१ लाख ८८ हजार रुपये, श्रीरामपूर तालुक्यातील १८ रुग्णांना ४१ लाख ३४ हजार ५०० रुपये, अकोले तालुक्यातील एका रुग्णाला २ लाख ६२ हजार ५०० रुपये तसेच पुण्यातील एका रुग्णाला ३ लाख रुपयांचे अर्थसाहाय्य उपलब्ध करून देण्यात आले आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे