ब्रेकिंग

स्मार्ट मिटर चे विरोधात पुणतांबा शहर शिवसेनेचा इशारा

स्मार्ट मिटर चे विरोधात पुणतांबा शहर शिवसेनेचा इशारा

पुणतांबा विज वितरण महामंडळ पुणतांबा येथील स्मार्ट मिटर धारक घरगुती व कमरशियल वाढीव बिलाचा झटका नागरिकांना बसत असल्याच्या तक्रारी पुराव्यानिशी पुणतांबा शहर शिवसेने कडे आल्याने शिवसेना शहरप्रमुख महेश कुलकर्णी शैलैश गगे यांनी पुणतांबा विज वितरण सब स्टेशनला भेट दिली असता, नुकतेच पदभार घेतलेले नवनिर्वाचित अधिकारी श्री कपिल कानडे साहेब यांच्या बरोबर या वाढीव बिलाचा बाबद चर्चा करुन त्यांना याबाबत काही बिलांच्या प्रतिंचे सादर करुन सर्व सामान्य जनतेवर महाराष्ट्र राज्य सरकारने लादलेले स्मार्ट मिटर डोकेदुखी ठरत आहे सामान्य माणूस यात भरडत आहे ज्यांची बिले 400/500रुपये येत होते त्यांना आज 1000/2000/3345 रुपये असे अव्वाचे सव्वा बिल येत आहे स्थिर आकार 500/1000 येत असुन हि लुट अन्यायकारक असून आम्हाला न्याय मिळावा अन्यथा स्मार्ट मिटर स्वताहुन काढुन त्याची पुणतांबा विज वितरण सब स्टेशन येथे पुणतांबेकरांचे वतीने सामुहिक पणे होळी करण्यात येईल असा इशारा शहर शिवसेनेचे वतीने दिला* *या प्रसंगी नवनिर्वाचित अधिकारी श्री कपिल कानडे साहेब यांचा पुणतांबा शिवसेना शहरप्रमुख महेश कुलकर्णी शैलैश गगे यांनी शाल श्रीफळ देऊन सत्कार केला, यावेळी विज वितरण सब स्टेशनचे कर्मचारी बोराडे, दुसाने, चव्हाण, समिर शेख, अॉपरेटर जगदाळे, यांचे सह अनेक जन उपस्थित होते

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे