वाढीव घरपट्टीविरोधात कोपरगावात राष्ट्रवादी काँग्रेस ठाम;जुन्याच पद्धतीने कर आकारणी मागणीचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

वाढीव घरपट्टीविरोधात कोपरगावात राष्ट्रवादी काँग्रेस ठाम;जुन्याच पद्धतीने कर आकारणी मागणीचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
कोपरगाव वार्ताहर :-कोपरगाव नगरपरिषद प्रशासनाकडून कोपरगाव नगरपरिषद हद्दीतील नागरिकांना वाढीव दराने घरपट्टी (मालमत्ता कर) आकारण्यात आली आहे. वाढीव कराच्या अधिकृत घरपट्टी पावत्या देखील नागरीकांना देण्यात आल्या आहेत. मात्र या वाढीव घरपट्टी आकारणी बाबत नागरीकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला असल्याने हजारो नागरिकांनी वाढीव घरपट्टी विरोधात हरकती नोंदविल्या आहे. आधीच वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य, मजूर, ज्येष्ठ नागरिक, मध्यमवर्गीय कुटुंब आणि अल्प गटातील नागरिकांचे कंबरडे मोडले असून त्यात हि अवाजवी घरपट्टी (मालमत्ता कर) लादने अत्यंत अन्यायकारक असल्याने कोपरगाव शहरात जुन्या पद्धतीनेच घरपट्टी आकारण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्या कडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

दिलेल्या निवेदनात त्यांनी असे म्हटले आहे की, मालमत्तांचे चुकीचे वर्गीकरण, कर निर्धारणातील त्रुटी, आकारणीतील विसंगती तसेच नागरिकांना पुरेशी माहिती न देता करण्यात आलेली आहे. याच बरोबर केलेली वाढ हि थोडी थोडकी नसून दुप्पट, तिप्पट तर काही ठिकाणी चौपट देखील करण्यात आली असल्याने याबाबत अनेक हरकती व तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत. जून महिना संपला असताना देखील पाऊस झालेला नसल्याने बाजारपेठ ही ठप्प आहे. त्याच बरोबर वाढलेली महागाई, आवाक्याबाहेर चाललेला जीवनावश्यक खर्च अशा आर्थिक अडचणींचा सामना करीत असलेल्या कोपरगावच्या नागरिकांवर वाढीव घरपट्टी लादल्यास त्यांच्या आर्थिक अडचणी अधिकच वाढणार असल्याने आ. आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव शहरात २ दिवसांचे धरणे आंदोलन करण्यात आले आहे. या आंदोलनाला शहरातील अनेक सामाजिक संस्था आणि मालमत्ता धारकांनी पाठींबा दर्शिवलेला आहे.

कोपरगाव नगरपरिषद सर्वसाधारण सभेत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नगरसेवकांनी अवाजवी वाढीव घरपट्टी विषयावर चर्चा करून सकारात्मक निर्णय घेण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र नगरपालिका सत्ताधारी या विषयावर आजतागायत चर्चा करण्याची तयारी दर्शिवत नसल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नगरसेवकांनी अहिल्यानगर जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्याकडे निवेदन सदर करून कोपरगाव शहरात जुन्या पद्धतीनेच घरपट्टी आकारण्यात यावी अशी मागणी केली आहे.यावेळी सुनिल गंगुले, गटनेत्या नगरसेविका सौ. गौरीताई पहाडे, हाजी मेहमूदभाई सय्यद, शैलेश साबळे, संदीप कपिले, सौ. निर्मलाताई आढाव, सौ. सोनमताई त्रिभुवन, बाळासाहेब रुईकर, माजी नगरसेवक मंदार पहाडे, रमेश गवळी, अरुण त्रिभुवन आदी उपस्थित होते.

संपादक रवींद्र जगताप,कोपरगाव
सत्य एक्सप्रेस न्युजच्या व्हाँटसाँप ग्रुपवर सहभागी होण्यासाठी खालील लिंक दाबा
https://chat.whatsapp.com/LKQzgSRnpEmErDjaBKTgct
कोपरगावात वास्तव राहिलेल्या शुरविरांची एतिहासिक माहिती सांगणारे सुमित डेंगळे यांचे व्याख्यान
https://youtu.be/Df5URqrYhUg?si=Ekk0eEF7k6jq00Hr
सत्य एक्सप्रेस youtbe chhanal पहाण्यासाठी खालील लिंक दाबा व चँनल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/@satyaexpressnews
धार्मिक ब्लाँग पहाण्यासाठी खालील लिंक दाबा
https://youtube.com/playlist?list=PL3j0O8rqVMWP4evas-rsmf1AV4ZkbIr8j&si=ZWWHIRV6FcdqDo2I
संपादक रविंद्र जगताप सत्य एक्सप्रेस
संपादकीय लेख क्र १२ :-कोपरगावचे पत्रकार शंकर दुपारगुडे यांच्या रुपाने जिल्ह्याचे नाव जगभर झळकले,सविस्तर लेख वाचण्यासाठी खालील लिंक दाबा
https://satyaexpress24x7.blogspot.com/2026/02/blog-post_28.html
संपादकीय लेख क्र ११ भारतातील वाढते औद्योगीकरण आणि वाढती लोकसंख्या नागरिकांच्या आरोग्यासमोरील गंभीर आव्हान सविस्तर लेख वाचण्यासाठी खालील लिंक दाबा
https://satyaexpress24x7.blogspot.com/2026/02/blog-post.html
संपादकीय लेख क्र. १० कोपरगावात थंडीचा वाढता जोर, तर निवडणुकीत उमेदवारांची धावपळ आणि कसरत ! सविस्तर लेख वाचण्यासाठी खालील लिंक दाबा
संपादकीय लेख क्र ९ स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जाहीर परंतु इच्छुक उमेदवारामध्ये कभी खुशी कभी गम सविस्तर लेख वाचण्यासाठी खालील लिंक दाबा
संपादकीय लेख क्र ८ मान्सून पूर्व पावसाने गृह उद्योगाचे मोठे आर्थिक नुकसान सविस्तर लेख वाचण्यासाठी खालील लिंक दाबा
https://satyaexpress24x7.blogspot.com/2025/05/blog-post_28.html
संपादकीय लेख क्र ७ कोपरगावचा बिहार बिड होवु नये यासाठी सर्वांनी एकत्र येणे गरजेचे सविस्तर लेख वाचण्यासाठी खालील लिंक दाबा
https://satyaexpress24x7.blogspot.com/2025/04/blog-post_88.html
संपादकीय लेख क्र. ६ चैत्र व वैशाख महिण्याचे कोपरगावचे अध्यात्मिक महत्व संपुष्टात? सविस्तर लेख वाचण्यासाठी खालील लिंक दाबा
https://satyaexpress24x7.blogspot.com/2025/04/blog-post_28.html
संपादकीय लेख क्र. ५ अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवटची आणि महत्वाची कोपरगाव शहरा नजीक असलेल्या या चौफुलीची दुर्दशा कधी मिटणार सविस्तर लेख वाचण्यासाठी खालील लिंक दाबा
https://satyaexpress24x7.blogspot.com/2025/01/blog-post_8.html
संपादकीय लेख क्र. ४ सावळीविहिर ते कोपरगाव रोड जलद गतीने होणे गरजेचे सविस्तर लेख वाचण्यासाठी खालील लिंक दाबा
https://satyaexpress24x7.blogspot.com/2024/06/blog-post.html
संपादकीय लेख क्र.३ श्रीमंतांच्या बेवड्या मुलांवर आवर घालणे गरजेचे सविस्तर लेख वाचण्यासाठी खालील लिंक दाबा
संपादकीय लेख क्र.2. जागतिक ग्राहक दिन, जागरूक ग्राहक होणे काळाची गरज, सविस्तर लेख वाचण्यासाठी खालील लिंक दाबा
https://satyaexpress24x7.blogspot.com/2024/03/blog-post_15.html
संपादकीय लेख क्र.१ कोपरगाव ची महाशिवरात्र आनंदाची एक पर्वणी आणि कोपरगावच्या महाशिवरात्रीचे बदलते स्वरुप सविस्तर लेख वाचण्यासाठी खालील लिंक दाबा
https://satyaexpress24x7.blogspot.com/2024/03/blog-post_9.html




