पशुसंवर्धन खात्याचे रिकामे भूखंड उद्योग उभारणीला द्या आणि पशु दवाखाने सुरु करा – आ. आशुतोष काळेंची विधिमंडळात मागणी

पशुसंवर्धन खात्याचे रिकामे भूखंड उद्योग उभारणीला द्या आणि पशु दवाखाने सुरु करा – आ. आशुतोष काळेंची विधिमंडळात मागणी
कोपरगाव वार्ताहर- कोपरगावात रिकामे पडून असलेले पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विभागाचे भुखंड उद्योग उभारण्यासाठी द्यावेत. तालुक्यातील जवळके, कुंभारी आणि शिरसगाव या गावात पशु दवाखाने सुरू करावेत. या दोन महत्वाच्या मागण्या आमदार आशुतोष काळे यांनी विधीमंडळाच्या सध्या सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात पुरवणी मागण्यांवरील चर्चेदरम्यान मांडल्या.

ते म्हणाले, कोपरगाव शहरात पशुसंवर्धन विभागाची ८६.४० हेक्टर आणि कॅटल ब्रीडिंग सेंटर फार्मच्या मालकीची १५.१९ हेक्टर अशी एकूण १०१.५९ हेक्टर जमिन पडून आहे. ही जागा उद्योग उभारणीसाठी हस्तांतरित करावी. त्याचा फायदा तालुका व जिल्ह्याला होईल. कोपरगावच्या दोन्ही बाजूने राष्ट्रीय महामार्ग आणि राज्य महामार्ग गेले आहेत. स्वतंत्र रेल्वे स्टेशन आणि जवळच शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि समृद्धी महामार्ग आहे. या जमिनीवर कृषी, दूध,अन्न प्रक्रिया उद्योग उभारता येतील. याशिवाय मालाच्या साठवणुकीसाठी वेअरहाऊस आणि कोल्ड स्टोरेजची निर्मिती करता येईल.

तालुक्यात ७४ हजार जनावरे आहेत आणि तुलनेत पशु दवाखाने कमी आहेत. जवळके, कुंभारी आणि शिरसगाव या गावात पशु दवाखाने सुरू करण्या बाबतच्या प्रस्तावांना तातडीने मंजूरी मिळावी. संवत्सर ग्रामीण रूग्णालयाचे काम सुरू आहे. तेथील प्राथमिक आरोग्य केंद्र कोकमठाण या गावामध्ये स्थलांतरित करण्याचा प्रस्ताव मंजूर करावा.
कोपरगाव विधानसभा मतदारसंघात कारण नसताना, तासंतास वीजपूरवठा खंडित होतो. एप्रिल मे महिन्यात मतदारसंघात अवकाळी पावसामुळे विजेचे खांब आणि वीज वाहिन्या कोलमडून पडल्या. शेतक-यांचे आणि पशुपालकांचे हाल होत आहेत. दुरुस्तीचे काम तातडीने पूर्ण करण्यासाठी महावितरण कंपनीने कामगारांच्या टोळ्या वाढवाव्या आणि दुरुस्तीच्या कामाला गती द्यावी. – आ. आशुतोष काळे.

संपादक रवींद्र जगताप,कोपरगाव
सत्य एक्सप्रेस न्युजच्या व्हाँटसाँप ग्रुपवर सहभागी होण्यासाठी खालील लिंक दाबा
https://chat.whatsapp.com/LKQzgSRnpEmErDjaBKTgct
कोपरगावात वास्तव राहिलेल्या शुरविरांची एतिहासिक माहिती सांगणारे सुमित डेंगळे यांचे व्याख्यान
https://youtu.be/Df5URqrYhUg?si=Ekk0eEF7k6jq00Hr
सत्य एक्सप्रेस youtbe chhanal पहाण्यासाठी खालील लिंक दाबा व चँनल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/@satyaexpressnews
धार्मिक ब्लाँग पहाण्यासाठी खालील लिंक दाबा
https://youtube.com/playlist?list=PL3j0O8rqVMWP4evas-rsmf1AV4ZkbIr8j&si=ZWWHIRV6FcdqDo2I
संपादक रविंद्र जगताप सत्य एक्सप्रेस
संपादकीय लेख क्र १२ :-कोपरगावचे पत्रकार शंकर दुपारगुडे यांच्या रुपाने जिल्ह्याचे नाव जगभर झळकले,सविस्तर लेख वाचण्यासाठी खालील लिंक दाबा
https://satyaexpress24x7.blogspot.com/2026/02/blog-post_28.html
संपादकीय लेख क्र ११ भारतातील वाढते औद्योगीकरण आणि वाढती लोकसंख्या नागरिकांच्या आरोग्यासमोरील गंभीर आव्हान सविस्तर लेख वाचण्यासाठी खालील लिंक दाबा
https://satyaexpress24x7.blogspot.com/2026/02/blog-post.html
संपादकीय लेख क्र. १० कोपरगावात थंडीचा वाढता जोर, तर निवडणुकीत उमेदवारांची धावपळ आणि कसरत ! सविस्तर लेख वाचण्यासाठी खालील लिंक दाबा
संपादकीय लेख क्र ९ स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जाहीर परंतु इच्छुक उमेदवारामध्ये कभी खुशी कभी गम सविस्तर लेख वाचण्यासाठी खालील लिंक दाबा
संपादकीय लेख क्र ८ मान्सून पूर्व पावसाने गृह उद्योगाचे मोठे आर्थिक नुकसान सविस्तर लेख वाचण्यासाठी खालील लिंक दाबा
https://satyaexpress24x7.blogspot.com/2025/05/blog-post_28.html
संपादकीय लेख क्र ७ कोपरगावचा बिहार बिड होवु नये यासाठी सर्वांनी एकत्र येणे गरजेचे सविस्तर लेख वाचण्यासाठी खालील लिंक दाबा
https://satyaexpress24x7.blogspot.com/2025/04/blog-post_88.html
संपादकीय लेख क्र. ६ चैत्र व वैशाख महिण्याचे कोपरगावचे अध्यात्मिक महत्व संपुष्टात? सविस्तर लेख वाचण्यासाठी खालील लिंक दाबा
https://satyaexpress24x7.blogspot.com/2025/04/blog-post_28.html
संपादकीय लेख क्र. ५ अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवटची आणि महत्वाची कोपरगाव शहरा नजीक असलेल्या या चौफुलीची दुर्दशा कधी मिटणार सविस्तर लेख वाचण्यासाठी खालील लिंक दाबा
https://satyaexpress24x7.blogspot.com/2025/01/blog-post_8.html
संपादकीय लेख क्र. ४ सावळीविहिर ते कोपरगाव रोड जलद गतीने होणे गरजेचे सविस्तर लेख वाचण्यासाठी खालील लिंक दाबा
https://satyaexpress24x7.blogspot.com/2024/06/blog-post.html
संपादकीय लेख क्र.३ श्रीमंतांच्या बेवड्या मुलांवर आवर घालणे गरजेचे सविस्तर लेख वाचण्यासाठी खालील लिंक दाबा
संपादकीय लेख क्र.2. जागतिक ग्राहक दिन, जागरूक ग्राहक होणे काळाची गरज, सविस्तर लेख वाचण्यासाठी खालील लिंक दाबा
https://satyaexpress24x7.blogspot.com/2024/03/blog-post_15.html
संपादकीय लेख क्र.१ कोपरगाव ची महाशिवरात्र आनंदाची एक पर्वणी आणि कोपरगावच्या महाशिवरात्रीचे बदलते स्वरुप सविस्तर लेख वाचण्यासाठी खालील लिंक दाबा
https://satyaexpress24x7.blogspot.com/2024/03/blog-post_9.html




