शंकरराव कोल्हेंच्या निधनाने कार्यव्यासंगातुन अध्यात्माची जडणघडण करणारे व्यक्तीमत्व हरपले_ श्री श्री १००८ शिवानंदगिरी महाराज
शंकरराव कोल्हेंच्या निधनाने कार्यव्यासंगातुन अध्यात्माची जडणघडण करणारे व्यक्तीमत्व हरपले_ श्री श्री १००८ शिवानंदगिरी महाराज
कोपरगांव :- संजीवनी उद्योग समुहाचे संस्थापक माजीमंत्री आणि गोरगरीबांचे अन्नदाते शंकरराव कोल्हे यांच्या निधनाने कार्यव्यासंगातुन अध्यात्माची जडणघडण करणारे व्यक्तीमत्व लोप पावले अशा शब्दात मंजुर येथील श्री श्री १००८ शिवानंदगिरी महाराज यांनी श्रध्दांजली वाहिली. त्यांनी तुम्हा-आम्हाला सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याची कामधेनू दिली आहे. त्यातुन त्यांच्या प्रत्येक कार्याला उजाळा द्या हीच त्यांच्या कार्यस्वप्नांची पुर्ती ठरणार आहे असेही ते म्हणाले. ते पुढे म्हणाले की, माजीमंत्री शंकरराव कोल्हे यांच्या निधनाने देश राज्य पातळीवरील सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक राजकीय अध्यात्मीक क्षेत्रातील अष्टपैलू व्यक्तीमत्वाची हानी झाली आहे. त्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत कोपरगाव मतदार संघाबरोबरच राज्यातील तळागाळातील उपेक्षीतांची सेवा केली. जिरायती भागात शाश्वत पाण्याची उपलब्धता व्हावी म्हणून त्यांनी पाणी अडवा पाणी जिरवा मोहिम संजीवनी जलसंवर्धन मोहिमेअंतर्गत राज्यात यशस्वी करून दाखवली. गोदावरी नदीवर बांधलेले बंधारे आणि गावा गावात उभे केलेले दगडी साठवण तलाव, पाझर तलाव, शेततळी, मातीचे बधारे हे इतिहासात शेवटपर्यंत त्यांच्या कार्याची साक्ष देत उभे राहतील शंकरराव कोल्हे स्वत: उच्च शिक्षीत असतानाही त्यांनी शेती आणि शेतक-यांच्या जीवनात समृध्दी आणण्यासाठी कधीही पदाचा गर्व केला नाही. दीन दलित उपेक्षीत समाजाचे छोटे छोटे प्रश्न त्यांनी विधीमंडळ स्तरावर मांडले त्यातुन राज्याला दिशा दिली. कर्मकांडात त्यांनी स्वतःला कधीही गुंतवून घेतले नाही पण अध्यात्माच्या विचाराची बांधीलकी आयूष्यभर जपली. त्यांची तिसरी पिढी आता त्यांचा वारसा समर्थपणे पुढे चालवित आहे. सहकाराच्या माध्यमातून त्यांनी येथील ग्रामिण अर्थकारणाला चालना देत अनेक कुटूंबाची घरे उजळून काढली आहेत त्यांच्या जाण्याने महान कार्यतपस्व्याला आपण मुकलो आहोत असे ते शेवटी म्हणाले




