क्रिडा व मनोरंजन

सिन्नरच्या पी के बॉईज संघाने बक्तरपुर सर्वज्ञ क्रिकेट क्लबचे पहिले बक्षिस पटकावले.

सिन्नरच्या पी के बॉईज संघाने बक्तरपुर सर्वज्ञ क्रिकेट क्लबचे पहिले बक्षिस पटकावले. 

कोपरगांव :-. तालुक्यातील बक्तरपुर येथील सर्वज्ञ क्रिकेट क्लबने दत्तात्रेय प्रभु यात्रेनिमीत्त अंडर आर्म टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा भरविल्या होत्या त्यातील पहिल्या क्रमांकाचे २१ हजार रूपयांचे बक्षिस सिन्नर येथील महाजनपुरच्या पी के बॉईज संघाने पटकावले त्याबददल त्यांचा जिल्हा बँकेचे संचालक विवेक कोल्हे यांनी सत्कार केला. समवेत सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यांचे संचालक मनेष गाडे उपस्थित होते. या क्रिकेट स्पर्धेसाठी दुस-या क्रमाकांचे साहेबराव कारभारी सानप यांच्या वतीने ११ हजार रूपयांचे बक्षिस सर्वज्ञ क्रिकेट क्लब बक्तरपुरने पटकावले. गोवर्धन सोपानराव सानप यांच्या वतीने तिस-या क्रमांकासाठी ७ हजार रूपयांचे बक्षिस शनेश्वर क्रिकेट क्लब वडगांव यांनी पटकावले. तर गणेश वाळीबा नागरे यांनी चौथ्या कमांकासाठी ५ हजार रूपयांचे बक्षिस ठेवले होते ते जे आर नाईन नाशिक संघाने पटकावले.  श्री. विवेक कोल्हे याप्रसंगी बोलतांना म्हणाले की, खेळ हा युवकांच्या जीवनातील अविभाज्य घटक असुन त्यासाठी प्रत्येकाने कुठल्या न कुठल्या स्पर्धेत सहभागी व्हायला हवे. खेळामुळे व्यायाम होवुन जीवन तंदुरूस्त राहते व युवकांमध्ये सांघीक भावना तयार होते. बक्तरपुरचा सर्वज्ञ क्रिकेट क्लब हा सातत्याने युवकांना प्रोत्साहन देण्यासाठी क्रीडा स्पर्धांचे आयोजन करत असतो त्याबद्दल त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे.याप्रसंगी माजी सरपंच संजय सानप, माजी उपसरपंच गणेश बुरकुल, सरपंच संजय बोडखे, कृष्णकांत सानप, चेतन बोडखे, मुरलीधर सानप, माधव गरूड, बादशहा सानप, सुकदेव सानप, मनोहर बोडखे, गणपत गरूड, भिमाजी सानप, वाळीबा नागरे, अशोक सानप, अरूण उगले, यादवराव सानप, दगुराव गरूड, माणिक सानप, अशोक सानप, साहेबराव बोडखे, माधवराव बोडखे, नाना गरूड, सुनिल सानप, बबन गरूड, शंकर सानप, छबुराव सानप, कृष्णा सानप, कृष्णा वामन सानप आदि पंचक्रोशीतील कार्यकर्ते, क्रिकेटपटु मोठया संख्येने उपस्थित होते. शेवटी माजी सरपंच संजय सानप यांनी आभार मानले.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे