ब्रेकिंग

तालुका क्रीडा समिती, कोपरगावच्या अध्यक्षपदी नितीन निकम, तर सचिवपदी मिलिंद कांबळे

तालुका क्रीडा समिती, कोपरगावच्या अध्यक्षपदी नितीन निकम, तर सचिवपदी मिलिंद कांबळे

क्रीडा शिक्षकांच्या सहविचार सभेत सन २०२६–२७ साठी समितीची सर्वानुमते निवड

कोपरगाव : बुधवार, दिनांक ०५ ऑगस्ट २०२६ रोजी कोपरगाव तालुका क्रीडा शिक्षकांची सहविचार सभा उत्साहपूर्ण व खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली. या सभेत तालुका क्रीडा समिती, कोपरगाव ची सन २०२६–२७ साठी सर्वानुमते निवड करण्यात आली.
समितीच्या अध्यक्षपदी नितीन निकम तर सचिवपदी मिलिंद कांबळे यांची निवड करण्यात आली.

सभेच्या अध्यक्षस्थानी आदरणीय श्री. सुमित दादा कोल्हे साहेब, सहअध्यक्ष, तालुका क्रीडा संकुल तथा विश्वस्त, संजीवनी ग्रामीण शिक्षण संस्था हे होते.यावेळी आदरणीय श्री. अरुण चंद्रे सर, अध्यक्ष, अहिल्यानगर जिल्हा शारीरिक शिक्षक महासंघ; आदरणीय श्री. मकरंद कोऱ्हाळकर सर, उपाध्यक्ष, बेसबॉल संघटना, महाराष्ट्र राज्य; आदरणीय श्री. राजेंद्र पाटणकर सर, राष्ट्रीय खेळाडू व ज्येष्ठ क्रीडा मार्गदर्शक तथा सचिव, तालुका क्रीडा संकुल, कोपरगाव; तसेच आदरणीय श्री. सचिन जाधव, संचालक, माध्यमिक शिक्षक सहकारी बँक, अहिल्यानगर तथा उपाध्यक्ष, जिल्हा माध्यमिक शिक्षक संघटना, अहिल्यानगर हे प्रमुख उपस्थित होते.

सदर सहविचार सभेस तालुक्यातील विविध शैक्षणिक संकुलातील क्रीडा शिक्षक, क्रीडा प्रशिक्षक, क्रीडा मार्गदर्शक व शिक्षक प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रारंभी उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.सभेच्या सुरुवातीस श्री. राजेंद्र पाटणकर यांनी प्रास्ताविक केले. त्यानंतर मागील शैक्षणिक वर्षाचे तालुका क्रीडा समितीचे अध्यक्ष श्री. धनंजय देवकर सर यांनी मागील वर्षातील तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धांची माहिती व कार्याचा आढावा उपस्थितांसमोर मांडला.यावेळी अनेक क्रीडा शिक्षकांनी आपली मनोगते व्यक्त केली. श्री. अरुण चंद्रे सर यांनी क्रीडा स्पर्धांचे नियोजन, आयोजन तसेच शारीरिक शिक्षकांच्या भरती प्रक्रियेबाबत मार्गदर्शन केले.श्री. मकरंद कोऱ्हाळकर सर यांनीही क्रीडा क्षेत्रातील विविध विषयांवर मार्गदर्शन करताना क्रीडा शिक्षक व खेळाडूंना येणाऱ्या संधींबाबत आपले विचार व्यक्त केले.सभेचे अध्यक्ष श्री. सुमित दादा कोल्हे साहेब यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना क्रीडा स्पर्धांमध्ये *सकारात्मक दृष्टिकोन, पारदर्शकता, शिस्त आणि खेळाडूंप्रती न्याय्य भूमिका* यांचे महत्त्व अधोरेखित केले. क्रीडा क्षेत्राच्या विकासासाठी सर्वांनी एकजुटीने व सकारात्मकतेने कार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले.त्यानंतर सन २०२६–२७ साठी तालुका क्रीडा समितीची सर्वानुमते निवड करण्यात आली. तसेच तालुकास्तरावर आयोजित करण्यात येणाऱ्या विविध १० क्रीडा स्पर्धांची ठिकाणे निश्चित करण्यात आली.

तालुका क्रीडा समिती, कोपरगाव
सन : २०२६–२०२७

अध्यक्ष : नितीन निकम

उपाध्यक्ष : अजित पवार , राजेंद्र देशमुख , रमेश पटारे

सहाध्यक्ष :शिवराज पाळणे , सुनील कदम

सचिव :मिलिंद कांबळे

सहसचिव : रमेश येवले , अशोक गायकवाड , सुरेश सोनवणे , अक्षय येवले

खजिनदार :निलेश बडजाते

प्रसिद्धी प्रमुख : गौरव डेंगळे

सदस्य : अमोल बोळीज , तुकाराम देवकर , राहुल सूर्यवंशी , विलास मोरे , योगेश बिडवे , रिजवान पठाण , रोहित महाले , पवन शिस्साठ

महिला प्रतिनिधी :सौ. सुरेखा लांडगे

जिल्हा संपर्क प्रमुख : अनुप गिरमे

निमंत्रित सदस्य :नितीन सोळके , गणेश दरेकर , देवेंद्र भोये

तांत्रिक समिती :विवेक नायकल , राहुल गोरे

संघटक :-
नगरपालिका केंद्र –
श्री. नारायण चौरे
सहजानंदनगर – श्री. प्रकाश शिर्के
चासनळी – श्री. बाजीराव गायकवाड
येसगांव – श्री. सुरेश कोकणी
दहिगाव बोलका – श्री. के.के. काळे
वारी – श्री. अनिल तेलगट
कोळपेवाडी- श्री. मनोज लोहोकरे
रांजणगांव देशमुख – श्री. रामदास गव्हाणे
रवंदे – श्री. एस.के. आहेर

नव्याने गठित झालेल्या तालुका क्रीडा समितीच्या पदाधिकाऱ्यांचा तसेच तालुकास्तरीय १० क्रीडा स्पर्धांच्या प्रमुखांचा सत्कार यावेळी करण्यात आला.अतिशय उत्साहपूर्ण, सकारात्मक व खेळीमेळीच्या वातावरणात ही सहविचार सभा पार पडली. तालुक्यातील क्रीडा क्षेत्राच्या विकासासाठी सर्व क्रीडा शिक्षकांनी एकत्रितपणे कार्य करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त केला.संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन क्रीडा शिक्षक अनुप गिरमे यांनी केले, तर आभार प्रदर्शन राजेंद्र देशमुख यांनी केले. कार्यक्रमास उपस्थित राहिलेल्या सर्व क्रीडा शिक्षकांचे यावेळी मनःपूर्वक आभार मानण्यात आले.

संपादक रवींद्र जगताप

सत्य एक्सप्रेस न्युजच्या व्हाँटसाँप ग्रुपवर सहभागी होण्यासाठी खालिल लिंक दाबा

https://chat.whatsapp.com/JcX8YoNk9gs6W6YGtE20ZI?s=cl&p=a&ilr=0&amv=2

बातम्यासाठी 9175751349 हा नंबर आपल्या व्हाटसाँप ग्रुपला अँड करा

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे