महाराष्ट्र

सामाजिक वारसा जपत शिवसेनेचा उपक्रम : अनाथाश्रमातील मुलांना खाऊ व शालेय साहित्य वाटप

सामाजिक वारसा जपत शिवसेनेचा उपक्रम : अनाथाश्रमातील मुलांना खाऊ व शालेय साहित्य वाटप

पुणतांबा शहराने आपला सामाजिक वारसा जपत विविध राष्ट्रीय पुरुषांच्या जयंती आणि पुण्यतिथींच्या निमित्ताने सामाजिक उपक्रम राबवला.लोकशाहिर अण्णाभाऊ साठे जयंती, लोकमान्य टिळक पुण्यतिथी, वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांची जन्मशताब्दी तसेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त पुणतांबा येथील मेथडिस्ट चर्च अनाथाश्रमातील मुलांना खाऊ व शालेय वस्तूंचे वाटप करण्यात आले.

हा कार्यक्रम बाल शिवसैनिक चि. उत्कर्ष महेश कुलकर्णी यांच्या हस्ते पार पडला. यावेळी तालुकाप्रमुख राजाभाऊ शेख, शिवसेना नेते सुहास वहाडणे आणि पुणतांबा शिवसेना शहरप्रमुख महेश कुलकर्णी यांचे विशेष सहकार्य लाभले.कार्यक्रमाच्या प्रसंगी मेथडिस्ट चर्चच्या वतीने पाळक जॉन पिटर साहेब यांनी प्रार्थना केली. यामध्ये राष्ट्रीय पुरुषांना आदरांजली अर्पण करण्यात आली तसेच उद्धवसाहेब ठाकरे यांना दीर्घायुष्य लाभावे यासाठी प्रार्थना करण्यात आली.

या उपक्रमाला अनाथाश्रमातील मुले तसेच चर्च कमिटीचे संजय पारधे सर, पुणतांबा शिक्षक सेनेचे विजय चांदेकर सर, वाल्मिक कुलकर्णी सर, वारकरी संप्रदायाचे बाळासाहेब साबळे यांच्यासह शिवसेना शहरप्रमुख महेश कुलकर्णी, उपशहरप्रमुख ज्ञानेश्वर नन्नवरे, जेष्ठ शिवसैनिक बाळासाहेब पवार, बाळासाहेब वाकचौरे, साहेबराव गुंजाळ, विशाल कचरे, युवासेनेचे सागर थोरात, कार्तिक थोरात, साई पगारे, प्रसाद थोरात उपस्थित होते.कार्यक्रमाच्या शेवटी चर्च कमिटीच्या वतीने उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार संजय पारधे सर यांनी मानले.

 

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे