कोपरगाव बस स्टॅन्ड आगारातील भांडार शाखेचे कडी कोयंडा तोडुन भांडार शोखतील 14,942 रु कि.ची मिटर वेल्डींग कॉपर वायर (ताव्यांची तार) रात्रीचे वेळी चोरुन नेणारा आरोपीस 48 तासाचे आत कोपरगाव शहर पोलीसांनी केली अटक
कोपरगाव बस स्टॅन्ड आगारातील भांडार शाखेचे कडी कोयंडा तोडुन भांडार शोखतील 14,942 रु कि.ची मिटर वेल्डींग कॉपर वायर रात्रीचे वेळी चोरुन नेणारा आरोपीस 48 तासाचे आत कोपरगाव शहर पोलीसांनी केली अटक,
कोपरगाव प्रतिनिधी . कोपरगाव बस स्टॅन्ड आगारातील भांडार शाखेचे कडी कोयंडा तोडुन भांडार शोखतील 14,942 रु कि.ची मिटर वेल्डोंग कॉपर वायर वेल्डींग होल्डरसह कोणीतरी अज्ञात चोरटयाने दिनांक 17/04/2022 रोजी रात्री 02.30 ते 03.30 वा चे दरम्यान चोरुन नेले बाबत बाबु तुळशीराम खरात, वय 53 वर्षे, धंदा नोकरी, रा. सोनारवस्ती, धारणगाव रोड, कोपरगाव यांनी कोपरगाव शहर पोलीस स्टेशनला अज्ञात चोरटयाविरुध्द फिर्याद दिल्याने कोपरगाव शहर पोलीस स्टेशन गु रजि नंबर 90/2022 भादवि कलम 457,380 प्रमाणे दिनांक 17/04/2022 रोजी 14/28 गुन्हा दाखल आहे.सदरचा गुन्हा दाखल झाल्याने पोलीस निरीक्षक, वासुदेव देसलें यांना त्यांचे गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, अस्लम उमर कुरेशी रा. सुभाषनगर कोपरगाव याने सदरचा गुन्हा केला असल्याची माहीती मिळाल्याने, मा. वरिष्ठांचे मार्गदर्शनाने पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांनी पो ना/अर्जुन दारकुंडे, पो.ना/2173 बी. एस. कोरेकर, पो कॉ/राम खारतोडे, पो कॉ/2563 जी. व्ही. काकडे पो कॉ/414 व्ही.एल. मासाळ अशांचे एक पथक तयार करुन सदर आरोपी हा कोपरगाव शहरामध्ये येताच मिळालेल्या माहीती प्रमाणे आरोपीतांचा शोध घेतला असता, आरोपी अस्लम उमर कुरेशी वय 26 वर्षे रा. सुभाषनगर कोपरगाव हा कोपरगाव शहरात मिळुन आल्याने त्यास ताब्यात घेवुन दिनांक 18/04/2022 रोजी त्यास सदर गुन्हयात अटक केली आहे. नमुद आरोपीस विश्वासात घेवून त्याचेकडेस गुन्हयाचे अनुषंगाने विचारपुस केली असता, सदर आरोपीने त्याचा साथीदार समाधान प्रविण पाटील याचे मदतीने सदरचा गुन्हा केला असल्याची कबुली दिली आहे. त्यावरुन सदर आरोपीचा साथीदार समाधान प्रविण पाटील वय 21 रा. सुभाषनगर कोपरगाव याचा शोध घेवून त्यास दिनांक 19/04/2022 रोजी सदर गुन्हयात अटक केली आहे. आरोपी 1) अस्लम उमर कुरेशी वय 26 वर्षे, रा. सुभाषनगर कोपरगाव, 2) समाधान प्रविण पाटील वय 21 वर्षे रा. सुभाषनगर कोपरगाव यांना सदर गुन्हयात अटक करून त्याचा पोलीस कोठडी रिमांड घेवून त्यांना विश्वासात घेवून त्यांचेकडेस गुन्हयातील गेले मालाबाबत विचारपुस केली असता आरोपीतांनी 14,000/-रु किची 21 किलो कॉपर वायर (ताव्यांची तार) काढुन दिल्याने ती पंचासमक्ष जप्त केली आहे. गुन्हयातील गेला माल हस्तगत केला आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक, वासुदेव देसले यांचे मार्गदर्शनाखाली पो ना/अर्जुन दारकुंडे हे करीत आहेत. सदरची तपास कारवाई मा. श्री. संजय सातव सो. उपविभागीय पोलीस अधिकारी सो, शिर्डी विभाग शिर्डी यांचे मार्गदर्शनाखाली पो.नि. वासुदेव देसले, पो ना/अर्जुन दारकुंडे, पो ना/2473 बी.एस. कोरेकर, पो कॉ/ संभाजी शिंदे, पो कॉ/राम खारतोडे, पो कॉ/2563 गणेश काकडे, पो कॉ/414 व्ही.एस.मासाळ, पो कॉ/कांदळकर यांनी केलेली आहे
