कृषीवार्ता

कृषी विभागाने यादी सार्वजनिक करावी…!उत्तम बादशहा पुणे.

कृषी विभागाने यादी सार्वजनिक करावी…!उत्तम बादशहा पुणे.

दोन वर्षापूर्वी खरीप सोयाबीन बियाणे उगवनी बाबत समस्या निर्माण झाल्या होत्या. अनेक तक्रारी ,फसवणुक अनुभव विचारात घेता मागील वर्षी घरचेच बियाणे ठेवण्याचे प्रबोधन कृषी विभाग मार्फत करण्यात आले. त्याचे चांगले परिणाम मिळाले.याही वर्षी ठराविक,प्रयोगशील शेतकऱ्यांना बियाणे योग्य सोयाबीन ठेवण्यास सांगितले आहे.किती शेतकऱ्यांनी बियाणे योग्य सोयाबीन राखून ठेवले याची यादी बनवली जाते. त्यावरून तालुका व जिल्हास्तरावर कोणत्या वाणाचे किती उपलब्ध होऊ शकते ही आकडेवारी विविध आढावा बैठकीत सांगितली जाते.अनेक प्रयोगशील शेतकरी उत्तम प्रकारे नियोजन करून बियाणे योग्य सोयाबीन उत्पादित करतात.अडचण असली तरी त्याची विक्री न करता राखून ठेवतात. अश्या शेतकऱ्यांची बनवलेली यादी किंवा मोबाईल नंबर कृषी विभागने सार्वजनिक करावी , असे मत ब्राम्हणगाव येथील प्रयोगशील शेतकरी,कृषी प्रश्नाचे अभ्यासक व रिसोर्स शेतकरी उत्तम पुणे यांनी व्यक्त केले.

त्यामुळे कोणत्या गावात, कुणाकडे ,कोणत्या वाणाचे,किती बियाणे उपलब्ध आहे याची माहिती इतर शेतकऱ्यांना मिळेल. यादी व मोबाईल नंबर मुळे बियाणे विकत घेणारे शेतकरी जवळच्या बियाणे उत्पादक शेतकऱ्यांशी संपर्क करून खात्रीशीर बियाणे घेऊन बियाणे होणारी फसवणूक टाळू शकतील.त्यातूनच ज्यांनी बियाणे राखून ठेवले त्यांचीही विक्री होणेस मदत होईल.कारण व्यक्तिगत पातळीवर शेतकरी फार मोठ्या प्रमाणात प्रचार,प्रसार व जाहिरात करू शकत नाही.कृषी विभागाने जरूर याबाबत विचार करून निर्णय घ्यावा अशी अपेक्षा उत्तम पुणे यांनी  व्यक्त केली

 

श्री : उत्तम बादशहा पुणे.

(रिसोर्स शेतकरी,कृषी विभाग महाराष्ट्र शासन)

मुक्काम..ब्राम्हणगावं

तालुका..कोपरगाव

जिल्हा..अहमदनगर

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे