कोळगाव पाटी सोसायटीच्या चेअरमनपदी काळे गटाचे ज्ञानेश्वर गुंजाळ व्हा. चेअरमनपदी तुषार गमे
कोळगाव पाटी सोसायटीच्या चेअरमनपदी काळे गटाचे ज्ञानेश्वर गुंजाळ व्हा. चेअरमनपदी तुषार गमे
कोपरगाव प्रतिनिधी – कोपरगाव तालुक्यातील कोळगाव पाटी विविध कार्यकारी सेवा सोसायटी मढी बु.च्या पार पडलेल्या पंचवार्षिक निवडणूक मा.आ.अशोकराव काळे व श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष ना.आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली बिनविरोध पार पडली आहे. या निवडणुकीत नवनिर्वाचित सदस्य मंडळात ज्ञानेश्वर सीताराम गुंजाळ, तुषार बबनराव गमे, ज्ञानदेव कचरू गवळी, तुकाराम विठ्ठल चव्हाण, एकनाथ गंगाधर गवळी, सौ. विमलबाई नानासाहेब गवळी,रामराव रखमाजी गवळी, ज्ञानदेव पांडूरंग कुऱ्हाडे, भागवत बहिरू मोकळ, रावसाहेब केशव चव्हाण, प्रवीण श्रीराम निंबाळकर सौ. हिराबाई नामदेव कुऱ्हाडे या काळे गटाच्या सदस्यांचा समावेश आहे. सोसायटीच्या चेअरमन, व्हा. चेअरमन पदाची निवडणूक नुकतीच पार पडली असून चेअरमन पदासाठी ज्ञानेश्वर सीताराम गुंजाळ व्हा.चेअरमन पदासाठी तुषार बबनराव गमे यांचा एकमेव अर्ज आल्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी आर. एन. रहाणे यांनी चेअरमनपदी ज्ञानेश्वर सीताराम गुंजाळ व व्हा. चेअरमनपदी तुषार बबनराव गमे यांची बिनविरोध निवड करण्यात आल्याचे जाहीर केले यावेळी सचिव नारायण राजगुरू यांनी निवडणूक कामी सहकार्य केले.याप्रसंगी कोळगाव पाटी व मढी बु. चे सोसायटी सभासद व माजी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सोसायटीचे नवनिर्वाचित चेअरमन ज्ञानेश्वर सीताराम गुंजाळ, व्हा.चेअरमन तुषार बबनराव गमे व सर्व नवनिर्वाचित सदस्यांचे माजी आमदार अशोकराव काळे व श्री साईबाबा संस्थान विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष ना.आशुतोष काळे यांनी अभिंनदन केले असून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत



