धार्मिक

साईधाम मंदिराचा १६ जून रोजी २३ वा वर्धापनदिन सोहळा

साईधाम मंदिराचा १६ जून रोजी २३ वा वर्धापनदिन सोहळा 

संपादक – रविंद्र जगताप

कोपरगांव – तालुक्यातील श्रीक्षेत्र शिंगणापुर परिसरातील अंबिकानगर येथील व संजीवनी अभियांत्रीकी महाविद्यालयाच्या लगत असलेल्या श्री साईघाम ट्रस्ट संचलित व साईभक्त प पू. धोंडीरामबाबा चव्हाण यांच्या प्रेरणेने स्थापन झालेल्या श्री साई मंदिराचा २३ वा वर्धापनदिन १६ जून रोजी सकाळी १० वाजता होत आहे तरी या कार्यक्रमांस जास्तीत जास्त भाविकांनी उपस्थित राहुन येथील सर्व धार्मीक कार्यक्रमासह महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन ट्रस्टच्यावतीने करण्यात आले आहे. मध्यंतरी दोन वर्षाच्या कालखंडात कोरोना महामारीमुळे वर्धापनदिन सोहळा साजरा करण्यावर मर्यादा आल्या होत्या. चालु वर्षी २३ व्या वर्धापनदिन सोहळयानिमीत्त अंबिकानगर साईधाम मंदिरात पहाटे ५ वाजता श्रींचे मुर्तीस अभिषेक व काकड आरती, सकाळी साडेसात वाजता सत्यनारायण महापूजा, सकाळी ११ ते १२ या वेळेत पालखी, दुपारी १२ वाजता माध्यन आरती व त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी साडेआठ ते दुपारी चार वाजेपर्यंत स्थानिक व विविध ठिकाणचे कलावतांचा भावगिते व प्रवचनाचा कार्यक्रम होईल तरी सर्व भाविकांनी याचा लाभ घ्यावा. प. पू. धोंडीबाबांचा भक्त परिवार भारत देशासह विदेशातही मोठया प्रमाणांत असुन त्यांनी १९९९ मध्ये साईधामची स्थापना केली. गुरूमनोकामना वृक्ष, शंकर महाराज मंदिर, ध्यान मंदिर, साईबाग, साईधुनी, नंदी आदि विविधतेने हा परिसर पुर्णपणे नटलेला आहे. साईबाबांच्या शिर्डी दर्शनांसाठी देश विदेशातुन येणारे साईभक्त याठिकाणी नतमस्तक होतात. ऑगस्ट 2019 मध्ये इटली येथील साईभक्त याठिकाणी दर्शनासाठी आले होते. धोंडीबाबांच्या अनेक प्रचिती असंख्य भक्तांना आलेल्या आहेत त्यामुळे प्रत्येक वर्धापनदिन येथे मोठया प्रमाणांत अन्नदान होते त्यासाठी भाविक सढळ हाताने मदत करतात.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे