धार्मिक

कोपरगाव येथे मातंग कुटुंबाची बौद्ध धम्मा कडे वाटचाल करीत धम्मदिक्षा कार्यक्रमाचे आयोजन…

कोपरगाव येथे मातंग कुटुंबाची बौद्ध धम्मा कडे वाटचाल करीत धम्मदिक्षा कार्यक्रमाचे आयोजन…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव- येथे लुंबिनी उपवन बुद्ध विहार गोदावरी तीरावर धम्मदीक्षेचा कार्यक्रम रविवार दिनांक १२-६-२०२२ रोजी ठीक ९-३०वा. भिक्खु मिलिंद बोधी (स्थविर) जेऊर अहमदनगर जिल्हा उपाध्यक्ष ,भिक्खु सचित्तबोधी अहमदनगर ,अखिल भारतीय भिक्खू संघाचे जिल्हाध्यक्ष भिक्खू आनंद सुमन सिरी यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.कोपरगाव येथील  जिल्हा न्यायालयातील सहाय्यक अधीक्षक आयु. आनंद सोनपसारे साहेब यांचे सहकारी आयु. दीपक चकाले व त्यांचे कुटुंब हे मूळचे मु. पोस्ट. धानोरा, ता. आष्टी, जि. बीड येथील रहिवाशी आहेत आणि हे कुटुंब मातंग समाजाचे असून आयु. आनंद सोनपसारे यांच्या संपर्कात आल्यामुळे तसेच बुद्ध धम्माबाबत चर्चा करून, डॉ. बाबासाहेबांच्या विचारांचा काही प्रमाणात अभ्यास  करून तसेच राष्ट्रपिता ज्योतिबा फुले, छत्रपती शिवाजी महाराज, संत गाडगे महाराज, माता रमाई, माता सावित्रीबाई फुले, माता जिजाऊ या महामानवांच्या विचाराने प्रेरित होऊन. या  कुटुंबाने बुद्ध धम्माची दीक्षा घेण्याचा अतिशय मंगलमय निर्णय घेतला आहे.  आयु. दीपक चकाले यांना पत्नी आयुष्यमती आरती दीपक चकाले व यांना दोन मुले आहेत. तरी हा धम्म दीक्षेचा मंगल सोहळा मोठ्या उत्साहात पार पडणार असून  या कार्यक्रमासाठी बुद्ध धम्म प्रसारक मंडळाचे सर्व सदस्य, बुद्धिस्ट यंग फोर्स चे सर्व पदाधिकारी व सदस्य, अखिल भारतीय बौद्ध महासभा कोपरगाव तालुका व शहर सर्व पदाधिकारी,धम्ममेघ फाउंडेशन सर्व पदाधिकारी व सदस्य उकडगाव, कोपरे फाउंडेशन कोपरगाव चे सर्व पदाधिकारी व सदस्य तसेच विविध संघटनेतील पदाधिकारी व  सदस्य उपस्थित राहणार असून हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार असून सर्वांनी उपस्थित रहावे. अशी विनंती आयु. आनंद सोनपसारे व त्यांचे सहकारी यांनी केली आहे..

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे