सामाजिक

मानव सुरक्षा सेवा संघाची बैठक आणि पदग्रहण समारंभ संपन्न

मानव सुरक्षा सेवा संघाची बैठक आणि पदग्रहण समारंभ संपन्न

समाजातील विविध घटकांवर होणाऱ्या अन्यायाला खपवून घेतले जाणार नाही- अमोल राखपसरे

श्रीरामपूर (शौकतभाई शेख) – येथील संगमनेर रोडवरील व्हीआयपी रेस्ट हाऊसमध्ये राष्ट्रीय मानव सुरक्षा सेवा संघाची बैठक आणि पदग्रहण समारंभ मोठ्या दिमाखात पार पडला,यावेळी संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमोल राखपसरे,प्रदेशाध्यक्ष ऍड. बशीरभाई भुरे,राष्ट्रीय सचिव भारत म्हसे,राष्ट्रीय प्रवक्ते भास्कर चकोर,राष्ट्रीय प्रवक्ते विकास भडकवाड,राज्याच्या महिला कार्याध्यक्षा नसिफा खाटीक, समता फाऊंडेशनचे अध्यक्ष शौकतभाई शेख,ऍड.मोहसिन शौकत शेख, संघटनेचे जिल्हा सचिव अजित गाढे,जिल्हा संघटक अजिंक्य कराळे,उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष युनूस शेख, उपाध्यक्ष डाॅ.गालिब कुरैशी, नाशिक जिल्हा उपाध्यक्ष नासिर खान,नाशिक जिल्हा उपाध्यक्ष अब्दुलकादीर अहमद आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी बोलताना श्री.राखपसरे म्हणाले की मानव सुरक्षा सेवा संघ ही संघटना समाजातील अन्यायग्रस्त उपेक्षित आणि दुर्लक्षितांच्या ज्वलंत प्रश्नासाठी देशभर कार्यरत असुन यापुढे कोणाही गोर -गरीब उपेक्षितांवर अन्याय सहन केला जाणार नाही, जर कोणी असा प्रयत्न करण्याचा प्रयत्नही केला तर त्यास रोख ठोकपणे उत्तर देऊन प्रतिकार केला जाईल,संघटनेच्या माध्यमातून प्रत्येक नागरीकाने पुढे येऊन गोर-गरीब उपेक्षितांना न्याय मिळवून देण्यासाठी पुढे यावे असेही ते म्हणाले,यावेळी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष ऍड. बशीरभाई भुरे,राष्ट्रीय प्रवक्ते विकास भडकवाड, भास्कर चकोर, महिला प्रदेश कार्याध्यक्षा नफिसा खाटीक,उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष युनुस शेख आदींनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी पारनेर जि.अहमदनगर येथील धडाडीचे सामाजिक कार्यकर्ते श्री.मोहन काळे यांची संघटनेच्या प्रदेश कार्याध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली,सोबतच अनेक पदाधिकाऱ्यांच्याही नियुक्त्या यावेळी करण्यात आल्या,या संघटनेत वकील, डॉक्टर,पत्रकार, समाजसेवक सेवानिवृत्त शासकीय अधिकारी यासोबतच समाजातील विविध उपेक्षित घटकांना सोबत घेऊन चांगल्या प्रकारे संपूर्ण देशामध्ये या संघटनेची कामे सुरू असुन गोरगरीब जनतेवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवला जात आहे.संघटनेच्या माध्यमातून हजारो व्यक्तींना  शासकीय योजनेचा लाभ मिळवून दिला जात आहे तसेच वेळप्रसंगी अनेक आंदोलने,उपोषणे करून जनतेला न्याय मिळून देण्याचे काम संघटनेच्या माध्यमातून केले जात आहे. याच पार्श्वभूमीवर श्रीरामपूर येथे पदग्रहण सोहळा पार पडला.यावेळी नूतन पदाधिकारी मोहन काळे,बलराम पांडे,चंद्रभान भारती, सुरेंद्र कुमार,आवेश खाटीक, राजू पारधी,आदींना संघटनेचे पदे देऊन जबाबदारी बहाल करण्यात आली,याप्रसंगी समता फाऊंडेशनचे अध्यक्ष शौकतभाई शेख,समता कॉम्प्यूटर इन्स्टिट्यूटचे ऍड.मोहसिन शौकत शेख,संघटनेचे नाजिम बशीर शेख,निजामोद्दीन सिराजोद्दीन शेख,माहिती अधिकार कार्यकर्ते सलीमभाई के.शेख,राज आर.चौधरी, इक्बाल (राजु) शेख, अल्ताफ शेख तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.सुत्रसंचलन ऍड.मोहसिन शेख यांनी केले तर आभार भारत म्हसे यांनी मानले.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे