राजकिय
कोपरगांव येथे भाजपाच्या ओबीसी जनजागृती संदर्भात बैठक संपन्न
कोपरगांव येथे भाजपाच्या ओबीसी जनजागृती संदर्भात बैठक संपन्न
कोपरगांव :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आठ वर्षात केंद्रीय प्रशासन गतीमान चालवुन भारत देशाची मान जगात उंचावलेली आहे, याप्रगतीत ओबीसी घटकांचा देखील तेव्हढाचा मोलाचा सहभाग असल्याचे प्रतिपादन भाजपाच्या प्रदेश सचिव सौ. स्नेहलताताई कोल्हे यांनी केले. शहरातील गुरुद्वारा रोडवरील कोपरगांव शहर व तालुका भारतीय जनता पक्ष कार्यालयात ओबीसी जनजागृती संदर्भात बैठक घेण्यांत आली त्यात त्या बोलत होत्या. प्रारंभी भाजपा ओबीसी मोर्चाचे राज्य उपाध्यक्ष प्रकाश चित्ते यांनी मार्गदर्शन केले, मायक्रो ओबीसी मोर्चा उत्तर नगरचे जिल्हाध्यक्ष दिपक राउत यांनी प्रास्तविक केले. सौ. स्नेहलताताई कोल्हे पुढे म्हणाल्या की, भाजपाने ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण मिळाले पाहिजे ही भूमिका पहिल्यापासून घेतलेली आहे, इम्पीरिकल डाटा संदर्भात राज्याचे नेतृत्व केंद्र शासनाच्या नावाने ओरड करत आहे मात्र वस्तुस्थिती तशी नाही असे त्या म्हणाल्या. याप्रसंगी ओबीसी मोर्चा उत्तर नगरचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब गाडेकर, भाजपाचे तालुकाध्यक्ष साहेबराव रोहोम, शहराध्यक्ष दत्ता काले, भाजपा युवामोर्चाचे तालुकाध्यक्ष विक्रम पाचोरे, गटनेते रविंद्र पाठक, शहराध्यक्ष अविनाश पाठक, सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे साखर कारखान्यांचे संचालक प्रदिपराव नवले, निवृत्ती बनकर, कैलासराव माळी, माधवराव रांधवणे, दिलीप बनकर, धोंडीबा सांगळे,किरण कोळपे, विजय कोळपे, दत्तात्रय वाघ, अंकुश कुऱ्हे,राजेंद्र सांगळे, महेश खडामकर, विजय भडकवाडे, शरद वाघ, प्रभाकर पारखे, अनिल साबळे, भगवान जाधव, रंजन साळुंके, रविंद्र साळुंके, अनिल सांगळे, विश्वनाथ आव्हाड, उत्तम मालकर, गंगाराम बनकर, लक्ष्मण मालकर, संजय मालजी, रमेश भास्कर, यश वाघ, प्रेम बारावकर,अशोक पठाडे,फकीर महमंद शेख, राहुल सुर्यवंशी, रोहन दरपेल, शंकर बिऱ्हाडे, रोहिदास पाखरे, चंद्रभान शिंदे, खालीकभाई कुरेशी, दिपक सुरे, विलास विघे,रविंद्र रांधवणे, सुभाष शिरसाठ, किशोर साळुंके, जनार्दन शिंदे, राजेंद्र चांडे, गोरख देवडे, सौरभ होते,सचिन उदावंत, शुभम वाजे, विलासराव माळी, मुकुंद काळे, शिवाजी खांडेकर, शुभम भागवत, अरुण महाजन, शशिकांत रांधवणे, नवनाथ खैरनार, निलेश सरोदे, संजय बोडखे,गोवर्धन सानप, कृष्णराव सानप, साहेबराव सानप, भिमराव संवत्सरकर,मुकुंद उदावंत,सचिन उदावंत यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी कायकर्ते मार्गदर्शक उपस्थित होते. शेवटी कोपरगांव भाजपा ओबीसी मोर्चाचे तालुकाध्यक्ष जगदिश मोरे यांनी आभार मानले



