सामाजिक

कोपरगाव शहर विकासात माजी नगराध्यक्ष स्व. माधवराव आढाव यांनी विविध माध्यमातून मोलाचे योगदान दिले:- विवेकभैय्या कोल्हे

कोपरगाव शहर विकासात माजी नगराध्यक्ष स्व. माधवराव आढाव यांनी विविध माध्यमातून मोलाचे योगदान दिले:- विवेकभैय्या कोल्हे

कोपरगाव प्रतिनिधी :-कोपरगाव शहर विकासात माजी नगराध्यक्ष स्व. माधवराव आढाव यांनी विविध माध्यमातून मोलाचे योगदान दिले असून यापूर्वीच्या असंख्य नगराध्यक्षांनी शहरवासीयांच्या दैनंदिन अडचणी समजावून घेत त्यात मार्ग काढला व शासन दरबारी विविध प्रस्ताव देऊन असंख्य कामे मार्गी लावत गोरगरिबांच्या उन्नतीचा खऱ्या अर्थाने मार्ग शोधला असल्याचे प्रतिपादन जिल्हा बँकेचे संचालक विवेकभैय्या कोल्हे यांनी केले. शहरातील मुख्य रस्त्यावर स्वातंत्र्यसेनानी कोपरगावचे माजी नगराध्यक्ष स्व.माधवराव आढाव उर्फ आप्पा यांच्या १०४ जयंतीनिमित्त प्रतिमेस विनम्र अभिवादन करण्यात आले त्याप्रसंगी ते बोलत होते. प्रारंभी विजय आढाव यांनी प्रास्ताविकात स्व. माधवराव आढाव यांच्या आठवणींना उजाळा देत शहर विकासात केलेल्या कामांची माहिती दिली.या प्रसंगी माजी नगराध्यक्ष जगन्नाथ आढाव,दत्तोबा जगताप, पराग संधान,दत्ता काले,प्रदिप नवले,अतुल काले,दिलीप दारुणकर,बाळासाहेब नरोडे,रवींद्र पाठक,कैलास जाधव,राजेंद्र सोनवणे,दिपक साळुंके, योगेश बागुल,बबलु वाणी,विनोद राक्षे, दिपकराव गायकवाड, बाळासाहेब आढाव,विजय भडकवाडे,विजय वाजे, स्वप्निल निखाडे, शिवाजी खांडेकर,अल्ताफ कुरेशी, संदिप देवकर, सुनिल देवकर, खालिक कुरेशी, फकीरमंहमद पहिलवान,अनिल जाधव,संदिप निरभवणे, विष्णुपंत गायकवाड,वैभव गिरमे,गोपीनाथ गायकवाड,अशोक लकारे,संतोष होने,सुशांत खैरे,राजेंद्र गंगुले, राजेंद्र बागुल, सोमनाथ म्हस्के, पिंटु नरोडे, विवेक सोनवणे दिपक जपे, आण्णा खरोटे, नितिन पोळ, रवींद्र रोहमारे, रोहन दरपेल, हाशमभाई पटेल, सतिश रानोडे, महावीर दगडे, कैलास खैरे, किरण सुपेकर, राजेंद्र पाटणकर, सुभाषजी पाटणकर,विजय चव्हाणके, आय्युबभाई टेलर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर विविध संस्थांचे आजी-माजी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे