राजकिय
नामदार आपल्या दारी, दुसऱ्याने केलेल्या कामाचे श्रेय घेण्याची त्यांची रीतच न्यारी_ माजी उपनगराध्यक्ष विजय वाजे यांची टीका
नामदार आपल्या दारी, दुसऱ्याने केलेल्या कामाचे श्रेय घेण्याची त्यांची रीतच न्यारी_ माजी उपनगराध्यक्ष विजय वाजे यांची टीका.
कोपरगाव:- नामदार आपल्या दारी, दुसऱ्याने केलेल्या कामाचे श्रेय घेण्याची त्यांची रीतच न्यारी अशा शब्दात माजी उपनगराध्यक्ष विजय वाजे यांनी टीका केली आहे. त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात पुढे म्हटले आहे की, तालुक्याचे लोकप्रतिनिधी आमदार आशितोष काळे यांनी तीन वर्षात केलेल्या घोषणातील निधींची गोळाबेरीज केली तर हजारो कोटीची आकडेवारी समोर येते, काळे यांच्या म्हणण्याप्रमाणे जर नगरपालिकेकरिता २६८ कोटी रूपयांचा निधी दिला तर प्रत्येक प्रभागाच्या वाट्याला १९ कोटी रूपये येतात, मग प्रभागात किती कामे झाली असती परंतू तसे काही दिसत नाही,. खरी वस्तुस्थिती काय आहे शहरासह तालुक्यातील सुज्ञ मतदाराला माहित आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपालिका यांना केंद्र राज्य शासनाकडून विविध योजनाखाली नियमित निधी येतच असतो, मग सत्ताधारी कुणीही असो. आजपर्यतच्या कोपरगांव तालुका व शहरातील निधींच्या कामाचे भूमिपुजने किंवा उद्घाटने हे त्या त्या स्थानिक पातळीवरील पदाधिकारी म्हणजेच नगरसेवक, जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य हेच करीत होते व त्याचे श्रेय त्यांनाच मिळत होते. आज पर्यतच्या कोणत्याही आमदारांनी या कामांचा श्रेय घेण्याचा केविलवाणा प्रयत्न केलेला नव्हता., मात्र आमदार आशुतोष काळे हेच या तीन वर्षाच्या काळात माजी आमदार सौ स्नेहलताताई कोल्हे यांनी आणलेला भरघोस निधी व त्यांच्या कार्यकाळात झालेल्या कामांचे आपण लोकार्पण सोहळा या गोंडस नावाखाली कार्यक्रम घेवुन आयत्या पिठावर रेघोट्या मारण्याचे काम करीत आहे. ज्या काही कोटयावधी रूपयाच्या आकडयांसह निधी आणल्याच्या वल्गना केल्या आहेत, त्यातील एक छदामही अद्यापपर्यंत आलेला नाही. त्याचप्रमाणे आरोग्य विषयक वल्गना केल्या त्या कोरोना महामारीच्या काळातील अनुभवामुळे केंद्र व राज्य शासनाने आरोग्य विषयाकडे विशेष लक्ष दिल्यामुळे तो निधी सर्वत्र दिला गेला आहे. यात व्यक्तीश: आमदाराचे काहीही योगदान नाही. कोवीड महामारीच्या काळात महात्मा गांधी चॅरिटेबल ट्रस्ट, कोपरगांव येथे शासनाच्या शासकिय खर्चातुन कोवीड सेंटर उभारले होते असे असतांना आमदारांनी मात्र त्या कोविड सेंटरला त्यांच्या आजोबांचे नाव देवुन जनतेला असे भासविण्याचा प्रयत्न केला की, हे कोविड सेंटर त्यांनी स्वखर्चातुन उभारले आहे. त्या ठिकाणी रुग्णांना भोजनाची पाकीटे दिली जात होती त्यावर सुध्दा आमदाराची छबी छापून रूग्ण व रूग्णांच्या नातेवाईकांच्या भावनेशी खेळण्याचा प्रयत्न केला. या उलट औद्योगिक वसाहतीचे अध्यक्ष जिल्हा सहकारी बँकेचे संचालक विवेकभैय्या कोल्हे यांच्या प्रयत्नातुन संजीवनी युवा प्रतिष्ठाणच्यावतीने आत्मा मलीक वस्तीगृहात प्राणवायू युक्त बेड सेंटर उभारण्यात आले होते. या संपुर्ण काळात त्यांची सर्व यंत्रणा व तीन रुग्णवाहिका कोणताही मोबदला न घेता अहोरात्र रुग्णांची सेवा करीत होती, असे असतांना सुध्दा विवेकभैय्या कोल्हे यांनी त्याबाबत कोणत्याही प्रकारचा गवगवा केला नाही ही गोष्ट तालुक्यातील व शहरातील जनता जाणुन आहे.गेल्या काही दिवसापासुन कोपरगांव शहरातील विविध प्रभागात लोकप्रतिनिधी नामदार आपल्या दारी या नावाखाली प्रभागवाईज बैठका घेत आहे. त्या प्रभागातील स्थानिक नगरसेवकांनी गेल्या पाच वर्षात चांगल्याप्रकारे विकास कामे केलेली आहे. त्यासर्व कामाचे श्रेय केविलवाण्या पद्धतीने आमदार रस घेत आहेत. गेल्या पाच वर्षात भाजप व सेना नगरसेवकांनी सर्वसाधारण सभेत बहुमताने मंजुर केलेले ठराव व नगराध्यक्ष तसेच नगरपालिका प्रशासनाने त्याला दिलेला सकारात्मक प्रतिसाद दिल्यामुळेच विकास कामे झालेली आहेत.
कोपरगांव शहरात तत्कालीन आमदार सौ. कोल्हे ताईंनी उपलब्ध करून दिलेल्या भरीव अशा निधीतुन पंचायत समिती कार्यालय उभे राहिलेले आहे. त्यात त्यांच्या आजोबांचा पुतळा उभारण्या पलीकडे कोणतेही ठोस काम केलेले नाही, असे शेवटी विजय वाजे यांनी म्हटले आहे.



