राजकिय

मढी खुर्द नंबर 2 सेवा सहकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी कोल्हे गटाचे रमेश आभाळे आहे तर उपाध्यक्षपदी निवृत्ती गवळी यांची निवड

मढी खुर्द नंबर 2 सेवा सहकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी कोल्हे गटाचे रमेश आभाळे आहे तर उपाध्यक्षपदी निवृत्ती गवळी यांची निवड
संपादक रवींद्र जगताप
कोपरगांव :-तालुक्यातील मढी खुर्द नंबर 2 सेवा सहकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी कोल्हे गटाचे रमेश आभाळे आहे तर उपाध्यक्षपदी निवृत्ती गवळी यांची बुधवारी बिनविरोध निवड झाली. निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून श्री. राजेंद्र जोशी यांनी काम पाहिले.याप्रसंगी संचालक सर्वश्री आण्णासाहेब आभाळे, शिवाजीराव गवळी, रामनाथ आभाळे, राजेंद्र गवळी, बापुसाहेब गवळी, रुंजा आभाळे, रमेश आभाळे, संजय भागवत, चंदन गोसावी सौ. सिंधुताई गवळी, सत्यभामाबाई आभाळे आदी उपस्थीत होते.यावेळी नवनिर्वाचित अध्यक्ष, उपाध्यक्षांचा सत्कार करण्यांत आला. संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे व भाजपच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांनी अभिनंदन केले. अध्यक्ष रमेश आभाळे म्हणाले की, माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी सहकाराच्या उन्नतीसाठी आयुष्य खर्ची घातले त्याचप्रमाणे संजीवनी कारखान्याचे माजी उपाध्यक्ष स्वर्गीय श्रीपतराव गवळी यांनी देखील गावच्या व सोसायटीच्या विकासात मोलाची भर घातलेली आहे, हा विजय त्यांना समर्पित करून जिल्हा बँकेचे संचालक विवेक कोल्हे यांचे मार्गदर्शनाखाली सभासद शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवू.याप्रसंगी सर्वश्री साहेबराव गवळी, सोपानराव गवळी, ज्ञानदेव गवळी, मच्छिंद्र आभाळे, रेवजी आभाळे, बाबासाहेब आभाळे, संजय गवळी, सतिष गवळी, विजय गवळी राजेंद्र गवळी, रजनीश आभाळे, अरूण गवळी, संदीप गवळी, शिवाजी आभाळे, दत्तात्रय आभाळे, कैलास आभाळे यांच्यासह विविध सारातील मान्यवर, सभासद कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थीत होते, शेवटी संचालक बापुसाहेब गवळी यांनी आभार मानले., सूत्रसंचालन सचिव संजय आभाळे, वैभव आभाळे यांनी केले
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे