सामाजिक

संवत्सर परिसरात बिपिनदादा कोल्हे यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण.

संवत्सर परिसरात बिपिनदादा कोल्हे यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण.
कोपरगाव:- तालुक्यातील संवत्सर गावात संजीवनी उद्योगसमूहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने प्राथमिक आरोग्य केंद्र, नवीन बसस्थानक इत्यादी ठिकाणी करंज, गुलमोहर, अशोका आदी विविध वृक्षांचे रोपण करण्यात आले. पर्यावरण संतुलनासाठी वृक्षारोपण अत्यंत गरजेचे असून संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिनदादा कोल्हे त्यासाठी सातत्याने प्रोत्साहन देतात असे कार्यकर्त्यांनी या वेळी मनोगतात सांगितले.याप्रसंगी सर्वश्री. त्रंबकराव परजणे , पांडुरंगशास्त्री शिंदे, शिवाजीराव बारहाते, सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे साखर कारखान्याचे संचालक ज्ञानेश्वर परजणे, फकीरराव बोरनारे, बापूसाहेब बारहाते, ग्रामपंचायत पंचायत सदस्य महेश परजणे, रामभाऊ कासार, संजीवनी पतसंस्थेचे उपाध्यक्ष राजेंद्र परजणे, राजेंद्र भाकरे, औद्योगिक वसाहतीचे संचालक पंडित भारूड, विजय काळे, प्रकाश बारहाते, अशोक लोहकणे, संदीप मैंद, निलेश परजणे, अभिजित आबक, प्रवीण भोसले, दत्तात्रेय परजणे, तन्मय परजणे, सुरेश भारूड, सुधाकर बोरनारे, दिनेश बोरनारे आदि पदाधिकारी उपस्थित होते. प्रास्तविक संचालक ज्ञानेश्वर परजणे, तर आभार पांडुरंगशास्त्री शिंदे यांनी मानले.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे