सामाजिक

बिपिनदादा कोल्हे यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर संपन्न.

बिपिनदादा कोल्हे यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर संपन्न.

कोपरगांव:-भगवंताने मानवाला अनमोल शरीरसंपदा दिली असुन त्यात डोळे सर्वागसुंदर बाब आहे, त्याद्वारे आपण सृष्टीची अनुभुती घेतो तेंव्हा डोळ्यांचे आरोग्य चांगले रहावे यासाठी प्रत्येकाने काळजी घ्यावी असे प्रतिपादन भाजपा गटनेते रविंद्र पाठक यांनी केले.संजीवनी उद्योग समुहाचे संस्थापक अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन कोपरगांव शहरातील संजयनगर गवारे फाऊंडेशन, महेश्वर मंदिर (कोळपेवाडी) व दत्त मंदिर (शिरसगांव) येथे सालाबादप्रमाणे याही वर्षी संजीवनी युवा प्रतिष्ठान, माजीमंत्री शंकरराव कोल्हे विचारधारा ट्रस्ट, डॉ. प्राची पवार यांच्या निलवंसत मेडीकल फाऊंडेशन व रिसर्च सेंटर नाशिक, मणिशंकर आय हॉस्पीटल, राष्ट्रसंत जनार्दन स्वामी हॉस्पीटल, आत्मा मालिक हॉस्पीटलच्या सहकार्याने मोफत नेत्र तपासणी, चष्मेवाटप व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीराचे मंगळवारी आयोजन करण्यात आले होते,त्याप्रसंगी ते बोलत होते.  प्रारंभी भाजपाचे शहराध्यक्ष दत्ता काले म्हणाले की, संजीवनी युवा प्रतिष्ठाणचे अध्यक्ष व जिल्हा सहकारी बँकेचे संचालक विवेकभैय्या कोल्हे हे जनसामान्यांची संकटे, दुःख हरण करण्यासाठी सातत्याने विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करत असतात, बिपिनदादा कोल्हे यांनी  हार तुरे शाली सत्कार  न स्विकारता समाजसेवेचे व्रत अंगिकारले आहे, त्याचाच एक भाग म्हणून मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीराचे ते गेल्या अनेक वर्षापासून उपक्रम राबवित आहे. ज्येष्ठ नागरिक भाऊसाहेब गायकवाड यांच्या हस्ते या शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. डॉ. मनोज बत्रा यांनी शिबिराच्या उद्देशाची माहिती दिली. याप्रसंगी डॉ. सायली ठोंबरे, डॉ. तेजस्विनी नाईकवाडे, डॉ. राहुल पारधे, डॉ. प्रशांत सगळगिळे, डॉ. नवनाथ घोलप, महेंद्र चौधरी, मोहिनी गायकवाड नवनीत चड्डा, मडकर, पठाण  आदींनी रुग्णांची मोफत नेत्रतपासणी केली.  या प्रसंगी सर्वश्री बाळासाहेब नरोडे, जितेंद्र रणशूर, हाशमभाई पटेल, शिवाजीराव खांडेकर, दिपक जपे, फकीरमहंमद पहिलवान, विजय चव्हाणके, किरण सुर्यवंशी, चंद्रकांत वाघमारे, प्रकाश खैरे, संतोष आढाव, अर्जुन मरसाळे, विशाल नाईकवाडे, बाबासाहेब साळुंके, सुरेश मरसाळे, सतिष रानोडे, राजेंद्र बागुल, गोपीनाथ गायकवाड, जगदिश मोरे, गोरख देवडे, सिध्दार्थ साठे, आण्णा खरोटे, पप्पु दिवेकर, वैभव गिरमे, अब्बासभाई सय्यद, मयुर रिळ, प्रदिप आहेर, शंकर बि-हाडे, खालीकभाई कुरेशी, रंजन त्रिभुवन, राहूल रणशुर, गौतम रणशुर, नकुल उबाळे, संजय त्रिभुवन, दिनेश कांबळे, यादवराव कवडे, रोहित कणगरे, सतिष चव्हाण, गोरख आढाव, अलताफ कुरेशी, संदिप निरभवणे, सोमनाथ ताकवले, इलियास खाटीक, प्रभुदास पाखरे, आशिकभाई शेख, मुन्नाभाई शेख, सुजल चंदनशिव, सचिन त्रिभुवन आदि विविध संख्याचे पदाधिकारी कार्यकर्ते, आजी माजी नगरसेवक मोठ्या संख्येने उपस्थीत होते. शेवटी  शहराध्यक्ष दत्ता काले यांनी आभार मानले

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे