सामाजिक
बिपीनदादा कोल्हे यांच्या वाढदिवसानिमीत्त् कृष्णाई मंगल कार्यालयात योगोपचार शिबीर
बिपीनदादा कोल्हे यांच्या वाढदिवसानिमीत्त् कृष्णाई मंगल कार्यालयात योगोपचार शिबीर
कोपरगांव:- संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन संजीवनी युवा प्रतिष्ठान व योग प्रचार प्रसार संस्थेच्यावतीने कृष्णाई मंगल कार्यालयात मंगळवारी योगोपचार शिबीराचे आयोजन करण्यात आले होते त्याचे उद्घाटन प्रजापिता ब्रम्हकुमारी सरलादिदी यांचे हस्ते झाले. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नागरीक मंचाचे विजय बंब होते. प्रारंभी योगाचार्य दत्ता पुंडे, विमल पुंडे यांनी प्रास्तविक केले, भाजपा महिला मोर्चाच्या शहराध्यक्षा वैशाली आढाव यांनी बिपीनदादा कोल्हे यांच्या सामाजिक कामाची माहिती दिली. प्रजापिता ब्रम्हकुमारीच्या सरलादिदी म्हणाल्या की, अतिरिक्त कामाच्या ताण तणावामुळे आरोग्याच्या तक्रारी वाढत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत देशाची ओळख आंतरराष्ट्रीय स्तरावर निर्माण करत योग साधनेचा जगात नावलौकीक वाढविला आहे, तेंव्हा प्रत्येकाने योगोपचार केलाच पाहिजे.याप्रसंगी सौ.अर्चनाताई लाड, उदयन्मुख अभिनेत्री करीश्मा हलवाई, डॉ.विलासजी आचारी, भाजपा शहराध्यक्ष दत्ता काले, कैलास खैरे, रविंद्र पाठक, वैभव, आढाव, अविनाश पाठक, दिलीप सोनवणे, स्वप्निल निखाडे, दिनेश कांबळे, अशोक लकारे, दिपक जपे, खालीकभाई कुरेशी, फकीर मंहमद कुरेशी, सतिष रानोडे, दादाभाऊ नाईकवाडे, किरण सुपेकर, सचिन सावंत, प्रज्वल अदिनाथ ढाकणे, कु. वैष्णवी अदीनाथ ढाकणे यांच्यासह असंख्य योग साधक,साधिका उपस्थित होते. शेवटी भाजपचे तालुकाध्यक्ष साहेबराव रोहम यांनी आभार मानले.



