ब्रेकिंग

जिल्हा बँक अंतर्गत सभासद पातळीवरील कर्जवसुलीत कोपरगांव तालुका जिल्हयात प्रथम-विवेकभैय्या कोल्हे

जिल्हा बँक अंतर्गत सभासद पातळीवरील कर्जवसुलीत कोपरगांव तालुका जिल्हयात प्रथम-विवेकभैय्या कोल्हे 
संपादक रविंद्र जगताप
कोपरगांव :-  नुकत्याच संपलेल्या ३० जुन आर्थीक पातळीवर अहमदनगर जिल्हा सहकारी बँक अंतर्गत २५ सभासद संस्था कर्ज वसुलीत कोपरगांव तालुका जिल्हयात सर्वप्रथम असल्याची माहिती संचालक विवेकभैय्या कोल्हे यांनी दिली.सोसायटी कर्जवसुलीचे प्रमाण ८६.६६ तर सहकारी साखर कारखान्यांसह ८६.९७ टक्के आहे. आजपर्यंत सर्वांत उच्चांकी वसुली म्हणून कोपरगांव तालुक्याचा नांवलौकीक वाढला आहे.  ते पुढे म्हणाले की, शेती आणि त्यावर अवलंबुन असलेल्या जोडधंद्यासाठी जिल्हा सहकारी बँकेने कोपरगांव तालुक्यातील १२१ सहकारी सोसायटयांना ९१ कोटी ८८ लाख १२ हजार रूपयांचे कर्ज वितरीत केले होते त्यापैकी ३० जून रोजी संपलेल्या आर्थीक वर्षात ७९ कोटी ४४ लाख ४६ हजार रूपयांचे कर्ज वसुल झाले असुन येथील सर्व सभासद व शेतक-यामध्ये समाधानाचे वातावरण आहे. आपणास जिल्हा बँकेवर संचालक म्हणून काम करण्याची संधी मिळाली त्यातुन तालुक्यातील सर्व सहकारी संस्था व सोसायटया यांचे प्रश्न दैनंदिन कामकाजात येणा-या अडचणी प्रत्येक मासिक बैठकीत मांडुन संबंधीत अधिका-यांकडुन त्याची सोडवणुक करून घेत संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांचे वेळोवेळी मार्गदर्शन मिळाले आहे. १२१ सहकारी सोसायटयापैकी ७५ संस्थेची १०० टक्के कर्जवसुली झाली आहे हा देखील अभिमान आहे. शेतकरी वर्गाला निसर्गाच्या लहरीपणाचा फटका बसतो, त्यामुळे त्याच्या कर्जातील वसुलीस अडचणी येतात पण सुदैवाने गेल्या २ वर्षापासुन येथील पर्जन्यमानाची स्थिती चांगली आहे. कर्जवसुलीसाठी कोपरगांव तालुका विकास अधिकारी अविनाश काटे, वसुली अधिकारी अशोक लोहकरे, १९ शाखांचे शाखाधिकारी, उपनिरीक्षक व त्यांचे सर्व अधिकारी यांचे विशेष सहकार्य लाभले. तालुक्यातील सर्व सहकारी सोसायटयांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व संचालक या कौतुकास पात्र असुन त्यांचे विशेष आभार संचालक विवेकभैय्या कोल्हे यांनी मानले आहे
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे