सामाजिक

जनता जनार्दनाच्या दरबारात विवेकभैय्या कोल्हे यांनी केली समस्यांची सोडवणुक

जिल्हा सहकारी बँकेचे संचालक विवेकभैय्या कोल्हे यांनी प्रत्येक महिन्यांच्या पहिल्या सोमवारी तहसिल व पंचायत समिती कार्यालयात जनता दरबार भरवुन त्यातुन वंचित घटकांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केले
जनता जनार्दनाच्या दरबारात विवेकभैय्या कोल्हे यांनी केली समस्यांची सोडवणुक 
संपादक :- रविंद्र जगताप
कोपरगांव :- कोपरगांव मतदार संघातील वंचित उपेक्षीत घटकांचे छोटे छोटे प्रश्न शासनस्तरावर मांडुन ते सुटावे यासाठी जनता जनार्दनांच्या दरबारात जिल्हा सहकारी बँकेचे संचालक विवेकभैय्या कोल्हे यांनी सोमवारी समस्यांची सोडवणुक केली. जिल्हा सहकारी बँकेचे संचालक विवेकभैय्या कोल्हे यांनी प्रत्येक महिन्यांच्या पहिल्या सोमवारी तहसिल व पंचायत समिती कार्यालयात जनता दरबार भरवुन त्यातुन वंचित घटकांचे प्रश्न सोडविले जाईल असे आवाहन केले होते त्याप्रमाणे सोमवारी ते तहसिलदार विजय बोरुडे यांच्या दालनात होते.    याप्रसंगी मुख्याधिकारी शांताराम गोसावी, गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी, उपअधीक्षक भूमिअभिलेख संजय भास्कर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विकास घोलप, विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.  यावेळी विवेकभैय्या कोल्हे यांनी सहा जून रोजीच्या पहिल्या जनता दरबार मधील समस्यांचा उहापोह करत नविन विभक्त रेशनकार्ड देतांना तहसील यंत्रणेकडुनच ऑनलाईन सुविधा करून मिळावी म्हणजे त्या लाभार्थ्यास अन्न सुरक्षा योजनेचा लाभ घेता येईल व प्रत्येक रेशनकार्ड लाभधारकास नियमीत धान्य मिळाले पाहिजे. २०१९ नंतर ज्या लाभार्थ्याना रेशनकार्ड देण्यांत आलेले आहेत त्यांना आजपर्यंत अन्न सुरक्षा योजनेचा लाभ मिळालेला नाही तरी तो लाभ तातडीने देण्यांत यावा., ग्रामपंचायत अंतर्गत असंख्य रहिवासीयांना घरकुले मंजुर झालेली आहेत मात्र त्यांना जागा नसल्यांने त्या लाभापासून सदरचे लाभार्थी वंचित राहतात त्यांच्यासाठी जागा उपलब्ध करून द्यावी, शेती महामंडळाच्या जागेवर राहणा-या कर्मचा-यांना निवासासाठी प्रत्येकी २ गुंठे जागा देण्याबाबतचा प्रस्ताव तयार करावा,. प्रत्येक गावास पुर्णवेळ ग्रामसेवक व तलाठी यांची नियुक्ती करावी, कोविड काळात मयत झालेल्यांच्या वारसांचे प्रस्ताव मंजुर आहेत त्यांना तातडीने भरपाईची रक्कम मिळावी, घरकुल ड यादीतून वगळण्यांत आलेल्या व सिस्टीम रिजेक्टेड लाभार्थ्यांचा पुन्हा ड यादीत समावेश करण्यांत यावा., शिंगणापुर बोलकी शिवरस्ता अतिक्रमण मुक्त करून वहिवाटीस खुला करण्यांत यावा., समृध्दी महामार्गालगत वॉल कम्पाउंडचे काम चालु झालेले आहे त्यामुळे शेतक-यांचे जुने वहिवाटीचे रस्ते बंद होत आहेत,. त्यांना शेतात ये जा करण्यासाठी रस्ते ठेवण्यांत यावे. पुर्वीच्या वहिवाटीच्या पाटपाण्यांच्या चा-या नाले, समृध्दी महामार्गाचे काम करतांना बुजवून टाकण्यांत आलेल्या आहेत त्या नव्यांने पुर्ववत करून मिळाव्या., त्याचप्रमाणे समृध्दी महामार्गावर पावसाचे पडणारे पाण्यामुळे भरावाचा खळगा थेट चांगल्या शेत जमिनीत जाउन त्या नापिकी होण्याची भिती वाढली आहे त्याचा बंदोबस्त व्हावा, जेउर पाटोदा येथील नगरपालिका हददीतील पालिका शिवरस्ता चर खुला करून मिळावा यासह अन्य समस्या मांडुन त्या प्राधान्यांने सोडवाव्यात म्हणुन मागणी केली.याप्रसंगी सर्वश्री शरद थोरात, शहराध्यक्ष डी. आर. काले, विजय वाजे, दीपक जपे, जितेंद्र रणशूर, खालिक भाई कुरेशी, जगदीश मोरे, अविनाश पाठक, वैभव आढाव, सोमनाथ म्हस्के, रवी पाठक, रविंद्र रोहमारे, सतिष रानोडे, स्वप्निल निखाडे, दिनेश कांबळे, संदीप ढोमसे, राजेंद्र गवळी, आनंद शिंदे, अण्णासाहेब गांगवे, कानिफ गुंजाळ, बाबासाहेब नेहे, सतिष पवार, भाऊसाहेब वक्ते, प्रभाकर नेहे, बबनराव निकम, फकरिराव टेके, विष्णुपंत क्षीरसागर, अनिल थोरात, प्रकाश भाकरे, भिमा संवत्सकर, सतीष केकान, प्रशांत आढाव, बापू पवार, सुरेश चंदनशिव, राजेंद्र चांडे, किशोर शिंदे, संतोष चांडे, आकाश चांडे, पंकज शिंदे, दिपक चांडे, तेजस चांडे, किसन गव्हाळे, अशोक शिंदे, सुभाष शिंदे, सुरेश शिंदे, रवींद्र शिंदे, पिराजी शिंदे, राजेंद्र हारदे, बबन साळुंके, ज्ञानदेव गायके, सुजल चंदनशिव, भाऊसाहेब खिरडकर आदी उपस्थित होते.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे