आत्मा मालिक सत्संग मंडळाचा पायी दिंडी सोहळा झाला संपन्न

आत्मा मालिक सत्संग मंडळाचा पायी दिंडी सोहळा झाला संपन्न
कोपरगाव प्रतिनिधी:-गेले दोन वर्ष करोनामुळे पायी दिंडी वाऱ्या त्याच बरोबर सर्व मंदिरेही बंद होते.हळु हळु सगळं आज पूर्व पदावर येत आहे .महाराष्ट्रात आषाढी एकादशी हा मोठा सण साजरा केला जातो.पंढरपूरला भाविक भक्त मोठ्या संख्येने दिंडी घेवुन जात असतात. गावोगावी दिडींचे आयोजन वारकरी बांधवांनी केलेले असते.कोपरगाव शहरात आज आषाढी एकादशीच्या निमित्ताने महादेव नगर गुरुद्वारा रोड खर्डे बिल्डिंग ते जंगली महाराज आश्रम पायी दिंडी सोहळा मोठ्या उत्साहात पार पाडला आत्मा मलिक सत्संग मंडळ कोपरगाव यांचे या दिंडीचे 19 वे वर्ष होते बरेच भाविक भक्त या दिंडीत सहभागी होते विशेषतः सकाळी पाऊस असताना सुद्धा लहान मुले मुली वयोवृद्ध महिला यांनी सहभाग घेतला या दिंडीचे नियोजन श्री बी टी खर्डे काका बाबू काटकर देवा मोरे राहूल भागवत अतुल दोरकर रोहन दरपेल प्रीतम काटकर मंगेश मोरे महेश दोरकर बेबीताई सोनवणे साळी लताताई लहिरे होणे मावशी चवंडके ताई आदींनी या दिंडीसाठी परिश्रम घेतले दर गुरुवारी रात्री ९:३० ते १०:३०या वेळेत खर्डे बिल्डिंग येथे सत्संग ऒयोजित केलेला असुन भाविकांनी या सत्संगाचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.




