राष्ट्रपतीपदी दौपदी मुर्मू यांच्या निवडीबद्दल आदिवासी मुलींना परजणे यांच्यातर्फे वह्यांचे वाटप
राष्ट्रपतीपदी दौपदी मुर्मू यांच्या निवडीबद्दल आदिवासी मुलींना परजणे यांच्यातर्फे वह्यांचे वाटप
कोपरगांव:-भारताच्या १५ व्या राष्ट्रपती म्हणून भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या उमेदवार श्रीमती दौपदी मुर्मू यांची निवड झाल्याच्या आनंदाप्रित्यर्थ संवत्सर येथील नामदेवराव परजणे पाटील महाविद्यालय व जनता इंग्लिश स्कूलमधील आदिवासी समाजातील मुलींना जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राजेश परजणे पाटील यांच्यावतीने मोफत वह्यांचे वाटप करण्यात आले. आदिवासी समाजातील ज्येष्ठ महिलांचाही याप्रसंगी गौरव करण्यात आला.भारताच्या सर्वोच्च अशा राष्ट्रपती पदावर आदिवासी समाजातील ज्येष्ठ महिला श्रीमती दौपदी मुर्मू यांची निवड झाल्याच्याप्रित्यर्य संवत्सर येथील ग्रामपंचायतीच्या कार्यालयात आयोजित केल्या गेलेल्या कार्यक्रमात परिसरातील आदिवासी समाजातील महिला, पुरुष व शाळकरी मुलींना निमंत्रित करून व मिठाईचे वाटप करुन आनंदोत्सव साजरा करण्यात आला. जिल्हा परिषदेचे माजी सदस्य व गोदावरी खोरे दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे पाटील यांच्यातर्फे आदिवासी शाळकरी मुलींना वह्यांचे वाटप करण्यात आले. तर समाजातील ज्येष्ठ महिला व कार्यकर्त्यांचा सरपंच सौ. सुलोचना ढेपले यांच्याहस्ते गौरव करण्यात आला.देशाच्या सर्वोच्च घटनात्मक पदावर श्रीमती दौपदी मुर्मू या पहिल्या आदिवासी महिला विराजमान झालेल्या आहेत. ओरिसासारख्या तुलनेने मागास असलेल्या मयुरभंज जिल्ह्यातील संथाल या छोट्याशा आदिवासी खेड्यात जन्माला आलेल्या दौपदी मुर्मू यांना पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या दूरदृष्टी नेतृत्वाने राष्ट्रपती पदाचा बहुमान मिळवून दिला. एका आदिवासी महिलेला हा सन्मान मिळाल्याने संपूर्ण भारतातून या निर्णयाचे स्वागत होत आहे. आदिवासी बांधवांकडून ठिकठिकाणी आनंदोत्सव साजरा करुन राष्ट्रपतींचे अभिनंदन केले जात आहे. शिक्षिका म्हणून आपल्या कारकिर्दीला प्रारंभ करणाऱ्या दौपदी मुर्मू यांची राष्ट्रपतीपदी बहुमताने निवड झाल्याने देशातील आदिवासी तसेच महिलांचा खऱ्या अर्थाने सन्मान झाला असल्याचे प्रतिपादन राजेश परजणे पाटील यांनी आपल्या भाषणातून केले.या कार्यक्रमास पंचायत समितीचे उप अभियंता चांगदेव लाटे, शाखा अभियंता गणेश गुंजाळ, शाखा अभियंता अश्विन वाघ, सरपंच सौ. सुलोचना ढेपले, उपसरपंच विवेक परजणे, नामदेवराव परजणे पाटील महाविद्यालयाच्या प्रा. कोताडे मॅडम, प्रा. आहेर मॅडम, जनता हायस्कूलचे मुख्याध्यापक रमेश मोरे, शिक्षक सुनील वाघमारे, लक्ष्मणराव साबळे, सोमनाथ निरगुडे, लक्ष्मणराव परजणे, अनिल आचारी, दिलीपराव ढेपले. बापू तिरमखे, ग्रामविस्तार अधिकारी आहिरे, लक्ष्मीबाई गायकवाड, आक्काबाई गायकवाड, हिराबाई गायकवाड, पद्मा माळी, मैनाबाई लोखंडे, विष्णू पवार, धज्ञानेश्वर पिंपळे, दनिवृत्ती मोरे, रामदास गायकवाड, भाऊसाहेब पिंपळे, विलास गायकवाड, दीपक पवार, वाल्मिक गायकवाड, रघुनाथ माळी, हिमगौरी साळुंके, गंगुबाई भवर यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. उप सरपंच विवेक परजणे यांनी आभार व्यक्त केले.



